शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

By admin | Updated: July 23, 2016 02:40 IST

जुईनगर येथे दरोड्याच्या तयारीत आलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

नवी मुंबई : जुईनगर येथे दरोड्याच्या तयारीत आलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सापळ्याची चाहूल लागताच दरोडेखोर पळू लागल्याने पोलिसांना त्यांचा थरारक पाठलाग करावा लागला. त्यांच्याकडून नेरुळमधील घरफोडीची उकल झाली आहे.जुईनगर परिसरात एक टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. प्रसंगावधानता राखून उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. यानुसार चव्हाण यांच्यासह उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, रुपाली पोळ, जगदीश पाटील, विद्याधर गायकवाड, अनिल सूर्यवंशी, गणेश चव्हाण, विकास जाधव यांच्या पथकाने जुईनगर सेक्टर २४ येथे सापळा रचला होता. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांचे पथक त्याठिकाणी दबा धरून बसलेले असताना काही जण रेल्वे पटरीवरून चालत येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु त्यांनाही पोलिसांनी सापळा रचलेला असल्याची चाहूल लागताच ते पळू लागले. यामुळे पोलिसांचाही त्यांच्यावरील संशय बळावल्यामुळे थरारक पाठलाग करावा लागला. त्यानुसार रेल्वे रुळावरून झाडीमध्ये अंधारात पाठलाग करून तसेच मोटरसायकलने पाठलाग करून पाच जणांना या पथकाने अटक केली. झडतीमध्ये त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य आढळून आले. यानुसार त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी नेरुळमध्ये एका मेडिकलवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. तसेच या दरोड्यात लुटलेले सामानही त्यांच्याकडे आढळून आले. प्रभू चौधरी (२१), समयवुन शेख (२०), रब्बीवुल शेख (२०), विष्णू मंडल (२१) व अमरुद्दीन शेख (५६) अशी त्यांची नावे आहेत. दरोड्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)