शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा परिषद सदस्याविरोधात अटक वॉरंट

By admin | Updated: March 8, 2017 21:40 IST

मुंबई नाका पोलीस ठाणे : सदस्य मनीषा पवार यांनी दिलेला धनादेश बाऊन्स

नाशिक : बांधकाम व्यवसायाच्या जाहिरातीपोटी दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आल्याने जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या सदस्य मनिषा पवार, त्यांचे पती रत्नाकर पवार व भागीदार नागेश पांडे या तिघांविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वारंट काढले आहे़ न्यायालयाने मुंबई नाका पोलिसांना या तिघांनाही अटक करण्याचे आदेशच या वॉरंटद्वारे दिले आहेत़जिल्हा परिषद सदस्या मनिषा पवार यांचे पती रत्नाकर पवार यांचा भागीदारीत बांधकाम व्यवसाय आहे़ त्यांनी बांधकाम व्यवसायाबाबत वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींच्या बिलापोटी एक लाख ४७ हजार रुपयांचा धनादेश एका जाहिरात कंपनीस दिला होता़ या कंपनीने तो वटण्यासाठी बँकेत जमा केला असता तो न वटता परत आला़ जाहिरात कंपनीने वेळोवेळी पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्यामुळे पवार दाम्पत्य व पांडे या तिघांविरोधात धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अ‍ॅड़ दीपक केदारे यांनी सांगितले़या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी (दि़७) या तिघांनाही हजर राहण्याचे आदेश दिले होते़ मात्र, हे तिघेही गैरहजर राहील्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी या तिघांच्याही अटकेचे आदेश मुंबई नाका पोलिसांना दिले आहेत़ मनीषा पवार या सौदाणे गटातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या असून निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहिर केले आहे. (प्रतिनिधी)