शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

सेवा कर न भरल्याप्रकरणी उद्योजकास अटक, कायद्यानंतरची शहरातील पहिलीच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 23:06 IST

ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसजी इंटेलिजन्स विभागाने एम.पी.एंटरप्राइजेस अँड असोसिएटस लिमिटेड(एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना सोमवारी अटक केली.

पुणे : ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसजी इंटेलिजन्स विभागाने एम.पी.एंटरप्राइजेस अँड असोसिएटस लिमिटेड(एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना सोमवारी अटक केली. त्यांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरची शहरातील ही पहिलीच कारवाई आहे.डीजीजीएसटीआयच्या पुणे क्षेत्रीय युनिटच्या उपसंचालक वैशाली पतंगे यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी इंटेलिजन्सच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबत जीएसटी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीनुसार एम. पी. एंटरप्राइजेस अँड असोसिएटस लिमिटेड(एमपीईएएल) ही कंपनी विविध सेवा पुरविणारी नोंदणीकृत कंपनी आहे. मनुष्यबळ पुरवठा एजन्सी, भाड्याने चारचाकी वाहन देणे, स्वच्छता सेवा आणि सुरक्षा आणि गुप्तहेर सेवा अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.पुणे शहरात विविध ठिकाणी त्यांची कार्यालये आहेत. कंपनीने विविध सेवा देताना २०१२ -१३ ते २०१५ -१६ दरम्यान सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वसूल केला. पण तो शासनाकडे न भरता त्याचा परस्पर अपहार केला. यापूर्वी त्यांची चौकशी केली असता कंपनीने ३ कोटी ४४ लाख रुपयांची तीच तीच चलने पुन्हा पुन्हा वापरुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. तसेच भाड्याने दिल्या जाणा-या वाहन देण्याच्या व्यवसायात १ कोटी ४९ लाख रुपयांच्या चुकीच्या नोंदी केल्याचे आढळून आले आहे. २०१५ -१६ मध्ये त्यांनी २ कोटी रुपयांचा कमी कर भरल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर फायनान्स अक्ट,१९९४ च्या कलम ९१(१) नुसार गुन्हा दाखल करून पाठक यांना सोमवारी बाणेर येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. पाठक यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली असली तरी त्यांच्या व्यवहारांची काटेकोर तपासणी केली जात असल्याचे वैशाली पतंगे यांनी सांगितले.देशभर जीएसटी लागू झाल्यानंतर त्यातील कराची रक्कम शासनाकडे भरली जात आहे की नाही, याची तपासणी जीएसटी इंटेलिजन्सकडून केली जात आहे. त्यात दोषी आढळणा-यांवर जीएसटी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. सेवा कर न भरणा-यांकडून शासनाबरोबरच ग्राहकांचीही फसवणूक केली जात असल्याचे जीएसटी इंटेलिजन्सकडून सांगण्यात आले.