शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

12 बंदुकींच्या हवेत तीन फैरीने अन अंतिम बिगुल वाजवून लष्कराची मानवंदना

By admin | Updated: February 16, 2016 19:47 IST

शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर आज मस्करवाडी येथे 12 बंदुकींच्या हवेत तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
 
सातारा :  शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर आज मस्करवाडी येथे 12 बंदुकींच्या हवेत तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री विजय शिवतारे, खा. विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर घार्गे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मस्करवाडी येथे पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. 
आज पहाटे कुकुडवाडी येथून लष्काराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. 'अमर रहे अमर रहे सुनील सूर्यवंशी अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, वीर जवान तुझे सलाम'  अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा मस्करवाडी या गावी पोहचली. या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.  या ठिकाणी पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली. येथे ग्रामस्थांनी  त्यांच्या पार्थिवाला पुष्प वाहून आदरांजली वाहिली. 
   यावेळी शिवतारे म्हणाले, सातारा ही वीरांची भूमी आहे शहीद कर्नल संतोष महाडीक, शहीद सुनील सूर्यवंशी असे वीर जवान जो पर्यंत या भूमीमध्ये जन्म घेत आहेत, तो पर्यंत आपल्या देशाकडे वाकडी नजर करुन पाहायची कोणाचीही हिंमत होणार नाही.  दुर्गम, दुष्काळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन या भागातील वीररत्ने भारत मातेच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतात याचा मला सार्थ अभिमान आहे. 
गावात मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात फ्लेक्स लावले होते. फुलांनी रांगोळ्या सजविलेल्या होत्या. ही अंत्ययात्रा  मस्करवाडी येथे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचली.  या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. 
लष्कराच्या 12 जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली. यानंतर शहीद सुनील सूर्यवंशी यांचे वडील बंधु तानाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.