शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

सेना-मनसे युती; नाशकात ‘कभी

By admin | Updated: January 28, 2017 16:47 IST

भाजपाशी काडीमोड घेण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर आता सेना-मनसे युतीची चर्चा सुरू झाली असली तरी नाशिकमध्ये मात्र डुबत्या जहाजात बसण्याची शिवसेनेची मानसिकता दिसत नाही.

नाशिक : भाजपाशी काडीमोड घेण्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर आता सेना-मनसे युतीची चर्चा सुरू झाली असली तरी नाशिकमध्ये मात्र डुबत्या जहाजात बसण्याची शिवसेनेची मानसिकता दिसत नाही. शिवसैनिकांकडून स्वबळाचाच नारा दिला असताना दोन्ही ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हास बंधनकारक असल्याचे सेना-मनसेचे पदाधिकारी स्पष्ट करत आहेत. राज्यातील दहाही महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा प्रजासत्ताकदिनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आणि भाजपाशी काडीमोड घेतला. भाजपाशी फारकत घेतल्यानंतर आता शिवसेना - मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार काय, या चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत सेनेची ताकद असल्याने मुंबई सेनेने घ्यावी आणि नाशिक मनसेला द्यावे, अशीही कंडी पिकविली जात आहे. सेना-मनसे युतीची चर्चा म्हणा अथवा अफवा, नाशिकमध्ये मात्र, शिवसैनिकांकडून या युतीवर फुली मारली जात आहे. भाजपाशी युती तोडल्याचा आनंदोत्सव शिवसैनिकांकडून साजरा केला जात असतानाच आता पुन्हा युतीचे झेंगाट नको, अशी मानसिकता शिवसैनिकांमध्ये दिसून येत आहे. त्यातच, नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने सातत्याने मनसेला विरोध दर्शविला आहे. मनसेच्या नवनिर्माणाची खिल्ली उडवितानाच महापालिकेत सत्ताधारी मनसेला नेहमीच लक्ष्य केलेले आहे. मनसेची पुरती हवा गुल झालेली असल्याने या डुबत्या जहाजात कोण बसणार? असा सवालही सैनिक व्यक्त करत आहेत. मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी २८ नगरसेवकांनी पक्ष सोडलेला आहे. त्यात सर्वाधिक १७ नगरसेवक हे शिवसेनेत गेले आहेत. सेनेमध्येच मोठ्या प्रमाणावर इच्छुक असताना मनसेशी युती करून सैनिकांची नाराजी ओढवून घेण्यासारखे असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसैनिकांची युतीबाबत मानसिकता नसताना मनसैनिकांमध्ये मात्र सावध पवित्रा घेतला जात आहे. सेना-मनसेची युती झाल्यास महापालिकेवर सत्ता नक्की असल्याचेही म्हटले जात आहे, तर काही मनसैनिकांकडून स्वबळाचीच भाषा ऐकविली जात आहे.