डिप्पी वांकाणी , मुंबई लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये शिजला असला तरी हे स्फोट भारतीय दहशतवाद्यांनीच केले, असा बनाव करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तींना भारतातच प्रशिक्षण देण्याची ‘लष्कर-ए-तोयबा’ची योजना होती. याची तयारी २००३ पासूनच सुरू झाली होती. परंतु ‘लष्कर’चा हा डाव फसल्याचे तपासातून उघड झाले. भारतातच असे प्रशिक्षण शिबिर सुरू करण्याची जबाबदारी ‘लष्कर’ने ज्याच्यावर सोपविली होती, त्या एहतेशाम सिद्दिकीला बुधवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.एहतेशाम सिद्दिकी हा स्वत:हून पाकिस्तानात ट्रेनिंग घेण्यासाठी कधी गेला नव्हता; तरीही लष्कर- ए- तोयबासाठी तो एक महत्त्वाची व्यक्ती होता. भारतात प्रशिक्षण शिबिरे चालविण्यासाठी जागा शोधण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तथापि, जमीर शेख, फैजल शेख, सोहेल शेख, मुजम्मील शेख, डॉ. तन्वीर शेख, कमल अन्सारी आणि मोहम्मद अली शेख यांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते. फैजलने तर पाकिस्तानात दोन वेळा प्रशिक्षण घेतले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एहतेशामने मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये जागेची पाहणी केली होती; पण त्याला योग्य जागा सापडली नाही.
‘लष्कर’ अपयशी!
By admin | Updated: October 1, 2015 03:04 IST