शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

सेना भवन होते ‘टार्गेट’

By admin | Updated: February 13, 2016 03:57 IST

शिवसेनाप्रमुख हे सुरुवातीपासूनच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे ‘लक्ष्य’ होते. हे आता अमेरिकेचा नागरिक डेव्हिड हेडलीच्या साक्षीने स्पष्ट झाले आहे. २६/११च्या हल्ल्यापूर्वी

मुंबई : शिवसेनाप्रमुख हे सुरुवातीपासूनच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे ‘लक्ष्य’ होते. हे आता अमेरिकेचा नागरिक डेव्हिड हेडलीच्या साक्षीने स्पष्ट झाले आहे. २६/११च्या हल्ल्यापूर्वी २००७मध्ये हेडलीने ‘शिवसेना भवन’चे आतून व बाहेरून चित्रीकरण केले होते. भविष्यात शिवसेना भवन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा लष्कर-ए-तोयबाचा कट होता, असा गौप्यस्फोट हेडलीने शुक्रवारच्या सुनावणीवेळी केला. अमेरिकेच्या अज्ञात स्थळावरून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सलग चौथ्या दिवशी डेव्हिड हेडलीने मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयात साक्ष नोंदवली. अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडली २६/११च्या मुंबईच्या हल्ल्यात माफीचा साक्षीदार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच मुंबईचे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी), नौदलाचा हवाई तळ हेदेखील लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआयचे ‘टार्गेट’ होते. याशिवाय दिल्लीचे नॅशनल डिफेन्स कॉलेजही (एनडीसी) ‘लष्कर’ आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांच्या रडारवर होते, अशी माहिती हेडलीने न्यायालयात दिली.हेडलीने साक्षीदरम्यान अनेक गौप्यस्फोट करून पाकिस्तान, आयएसआयचा बुरखा फाडला. शुक्रवारच्या सुनावणीवेळीही हेडलीने २००७मध्ये दादरच्या सेना भवनची आतून व बाहेरून रेकी करून व्हिडीओ शूट केल्याची माहिती न्यायालयाला दिली. ‘दादरच्या शिवसेना भवनात मी गेलो आहे. तेथे मी शिवसैनिक राजाराम रेगे यांच्याशी घनिष्ट संबंध निर्माण केले. रेगे यांनी परदेशी गुंतवणूकदारांना मुंबईत गुंतवणूक करण्यास सांगा, असे सांगितल्याचे त्याने न्यायालयात सांगितले.हेडलीने ‘बीएआरसी’लाही दिली होती भेट जुलै २००८मध्ये हेडलीने बीएआरसीला भेट दिली होती. साजिद मीरने हेडलीला तेथील एखादी व्यक्ती आयएसआयमध्ये भरती करण्याची सूचना केली होती.जेणेकरून बीएआरसीची संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून भविष्यात बीएआरसीही उडवता येईल, अशी मीरची कल्पना होती, असेही हेडलीने सांगितले.नौदलाचे एअर स्टेशन आयएनएस शिक्राही दहशतवाद्यांच्या यादीत होते. त्याचीही रेकी डेव्हिडने केली होती.व्हिडीओ आयएसआयला दाखविले‘मी कोणाच्याही सांगण्यावरून शिवसेना भवनची रेकी केली नाही. मात्र सेना भवनची रेकी केल्यास ‘लष्कर’च्या उपयोगाची नक्कीच पडेल, हे मला माहीत होते. पाकला परत गेल्यावर मी हे व्हिडीओ ‘लष्कर’च्या साजिद मीर आणि आयएसआयचे मेजर इक्बाल यांना दाखवले. दोघेही खूश झाले. भविष्यात हे व्हिडीओ सेना भवन आणि त्यांचे नेते (बाळासाहेब ठाकरे) यांना मारण्यासाठी उपयोगी येतील, असे साजिद म्हणाल्याचे हेडलीने सांगितले.देशभरातील छाबड हाउसची माहिती२६/११च्या हल्ल्यानंतर हेडलीने ७ ते १७ मार्च २००९ या १० दिवसांत दिल्लीच्या एनडीसीचे व्हिडीओ शूट केले. त्याला अल-कायदाचा म्होरक्या इलियास काश्मिरी याने एनडीसीची रेकी करण्यास सांगून आर्थिक मदतही केली. त्याने मला एनडीसी व पुणे, गोवा, दिल्ली येथील छाबड हाउसची रेकी करण्यास सांगितले. मात्र छाबड हाउसपेक्षा एनडीसीची रेकी करण्यास प्राधान्य दे, असे त्याने मला बजावले होते. मात्र याबद्दल मी ‘लष्कर’ला काहीच माहिती दिली नाही. कारण मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतातील वातावरण माझ्यासाठी सुरक्षित नव्हते. विशेषत: मी प्रसारमाध्यमांपासून वाचणे शक्य नव्हते म्हणून ‘लष्कर’ने मला भारतात येऊन दिले नसते. त्यामुळे मी त्यांना या रेकीविषयी काहीही कल्पना दिली नाही, अशी माहिती हेडलीच्या साक्षीद्वारे बाहेर आली आहे.पत्नीकडून अभिनंदन२६/११चा हल्ला यशस्वी झाल्यानंतर हेडली लाहोरला होता. तर त्याची पहिली पत्नी शाहजिया शिकागोमध्ये होती. तिने हा हल्ला यशस्वी झाल्याबद्दल हेडलीचे सांकेतिक भाषेत अभिनंदन केले. ‘ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याबद्दल तुझे (हेडली) अभिनंदन,’ असे शहाजिया हिने हेडलीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. त्यावर हेडलीने म्हटले की, मी चांगले मार्क मिळवण्यासाठी खूप मेहनत केली.गेट वे आॅफ इंडियावरून अतिरेकी घुसणार होते : साजिद आणि मेजर इक्बाल यांनी दहाही अतिरेक्यांसाठी मुंबईत घुसण्याकरिता गेट वे आॅफ इंडियाचा मार्ग निवडला होता. कारण ‘गेट वे’पासून हॉटेल ताज अत्यंत जवळ आहे. पण मी तो मार्ग रद्द करण्यास सांगितले. कारण या मार्गावरून येण्यापूर्वी नौदलाचा हवाई तळ ओलांडूनच ‘गेट वे’ला यावे लागले असते. नौदलाच्या हाती लागण्याची शक्यता असल्याने साजिद आणि इक्बालने माझा प्रस्ताव मंजूर केला.कसाबला ओळखलेकसाबविषयी प्रश्न विचारला असता हेडलीने सांगितले की, तो पकडला गेल्यानंतर साजिद मीर आणि एलईटीच्या सगळ्या सदस्यांना अतिशय वाईट वाटले. अ‍ॅड. निकम यांनी हेडलीला कसाबचा फोटो दाखवत हा कोण, असे विचारले. त्यावर हा कसाब असल्याचे सांगत हेडलीने पटकन उर्दूमध्ये कसाबच्या आत्म्यास शांती लाभो, असे म्हटले. न्यायाधीशांनी त्याबाबत विचारताच हेडलीने आपण कसाबच्या आत्म्यास शांती लाभो, असे म्हटल्याचे सांगितले.