शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

सेना-भाजपा वादाला नवी फोडणी

By admin | Updated: September 15, 2016 03:37 IST

मेट्रो प्रकल्प ३साठी १७ भूखंड मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिल्यानंतर आता पालिकेच्याच पैशांनी स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू झाली

मुंबई : मेट्रो प्रकल्प ३साठी १७ भूखंड मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिल्यानंतर आता पालिकेच्याच पैशांनी स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र मित्रपक्षाचे हे छुपे मनसुबे उधळून लावण्यासाठी शिवसेनेचीही मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शहकाटशहचे राजकारण खेळले जात असल्याचे दिसत आहे.मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी भूखंड देण्यास नकार देणारा ठराव पालिका सभागृहात मंजूर करून शिवसेनेने भाजपाची कोंडी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी हा ठराव रद्द करत तातडीने हे भूखंड मेट्रो प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. परंतु या प्रकल्पात बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा ठोस आराखडा सादर होईपर्यंत विरोध कायम असेल, असा इशारा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी बुधवारी दिला आहे.त्यापाठोपाठ आता स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पालिकेने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारलेला नाही. तरीही राज्य सरकारने पालिकेला स्वखर्चाने स्मार्ट सिटी संकल्पना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार फिटवाला मार्गापासून एलफिन्स्टन स्टेशनपर्यंत पर्जन्य जलवाहिन्यांच्या रुंदीकरणाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पअंतर्गत होत असल्याची नोंद पालिकेने केली आहे. यावर आक्षेप घेत हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्याची सूचना शिवसेनेने केली, मात्र असा प्रस्ताव अडवून शिवसेना जनतेचे नुकसान करीत आहे, अशी नाराजी भाजपाने व्यक्त केल्याने खवळलेल्या शिवसेनेने या प्रस्तावावर मतदान घेत मित्रपक्षाची खेळी उधळली आहे. (प्रतिनिधी)कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेचे १७ भूखंड तात्पुरत्या स्वरूपात तर २४ भूखंड कायमस्वरूपी लागणार आहेत. त्याशिवाय मेट्रो ३ चे काम सुरू करणे शक्य नाही. शिवसेनेने यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा हाती घेत रस्त्यावरची लढाई हाती घेतली. भूखंड हस्तांतरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे शिवसेना आणि भाजपात नव्याने वादाला तोंड फुटले आहे.प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन झाल्याशिवाय हा प्रकल्प होऊ देणार नाही. एमएमआरडीएकडे बरेच भूखंड आहेत. पालिकेला या भूखंडाच्या मोबदल्यात प्राधिकारणाने भूखंड द्यावेत, अशी मागणी प्रवीण छेडा यांनी केली आहे.