शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सेना गटप्रमुख हत्येप्रकरणी ५ अटकेत

By admin | Updated: October 23, 2014 04:10 IST

मालाड खोतडोंगरी परिसरात मंगळवारी संध्याकाळी शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांना अटक केली आहे.

मुंबई : मालाड खोतडोंगरी परिसरात मंगळवारी संध्याकाळी शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांना अटक केली आहे.अटक केलेल्या पाच आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. या अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.रमेश जाधव हे शिवसेनेचे गटप्रमुख होते तसेच मालाड खोतडोंगरी येथील बबनराय चाळीत वास्तव्यास होते. मंगळवारी संध्याकाळी अटक केलेल्या आरोपींचे खोतडोंगरी परिसरात एका मारवाडी दुकानदाराशी भांडण सुरू होते. त्यावेळी रमेश यांच्या लहान भावाने भांडण करता असे म्हणत हटकले असता त्या तरुणांनी रमेशच्या लहान भावालाच दटावले. त्यानंतर त्याने रमेश यांना फोन करुन बोलावले. पुढे दोन्ही गटांत वाद वाढत गेला. घटना घडली तेव्हा आरोपींच्या हातात हत्यार होते. रमेश जीव वाचवण्यासाठी पळत असताना एका घराच्या पत्र्यावरून घरांत कोसळले. त्यानंतर आरोपींनी त्या घरांत घुसून धारदार शस्त्राने रमेश यांच्यावर वार केले. जखमी रमेश यांना ट्रॉमा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेचे परिसरात तीव्र पडसाद उमटले, त्यांच्या नातेवाइकांसह शिवसेनेच्या नेत्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आंदोलन केले. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर रास्ता रोकोही केला. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याकरिता हे आंदोलन करण्यात आले. मध्यरात्री पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तसेच वातावरण चिघळू नये याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. तसेच मारिया यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करू, अशी ग्वाही दिली तेव्हा जमावाचा रोष निवळला. पोलिसांनी रात्री उशिरा मालाडमधून आरोपींना गजाआड केले. तिघा आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर अन्य दोन अल्पवयीन आरोपींना बुधवारी पहाटे अटक केली. (प्रतिनिधी)