ठाणे : ईव्हीएम मशीनमध्ये झालेला घोळाच्या मुद्यावरून शिवसेना आणखी आक्रमक झाली आहे. प्रभाग क्रमांक १० आणि ११ च्या सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी तेथील निकालालाच स्थगिती देऊन या संपूर्ण प्रकाराची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे स्थिगती मिळावी यासाठी भाजपाच्या पराभूत उमेदवाराचादेखील या सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये समावेश आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी शिवसेना तर काही ठिकाणी भाजपाचे संपूर्ण पॅनलच विजयी झाले आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित निकालामुळे सर्वच पराभूत उमेदवारांकडून निवडणूक प्रक्रि येवरच आक्षेप घेण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्र मांक १० आणि ११ मधील सर्वपक्षीय पराभूत उमेदवार एकवटले असून त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणल्यानंतर आता थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या दोन्ही प्रभागामध्ये शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस, मनसे आणि विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवारानेदेखील आक्षेप नोंदवला आहे. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारी रोजी हॉली क्र ॉस शाळेमध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता दोन संशयास्पद वाहनांनी स्ट्राँग रूमच्या आवारामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांना फोन करूनही त्या तब्बल चार तास उशिरा आल्या. त्यामुळे तणाव निवळण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जदेखील करावा लागला. मतमोजणीपूर्वी झालेल्या सर्व प्रकारचे चित्रीकरण दाखवण्यात यावे त्यानंतरच मतमोजणीला सुरु वात करावी अशी मागणी करूनही निवडणूक निर्णय अधिकारी पोवार यांनी ते न दाखवता मतमोजणीला सुरुवात केल्याने त्यांचीही चौकशीची मागणी या सर्व उमेदवारांनी केली आहे. विशेष म्हणजे स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नसल्याचे या उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, शिवसेनेच्या उमेदवार महेश्वरी तरे, भाजपच्या रत्नप्रभा पाटील आणि इतर सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच आक्षेप घेऊन फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाकडेदेखील यासंदर्भात तक्रार केली असून न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याची माहिती अनंत तरे यांनी दिली. (प्रतिनिधी)>मनसेनेही घेतला आक्षेपमनसेचे प्रदीप सावर्डेकर यांनी या मशिनवर आक्षेप घेतला असतांंना कोपरीतदेखील पक्षाच्या पराभूत उमेदवार समीषा मार्र्कं डे यांनीही आक्षेप घेतांना प्रभाग क्र मांक २० (ब ) मध्ये मतदानाच्या वेळी कोपरी गावातील शाळा क्र मांक १६ च्या रूम ५९ मधील एका मशीन मध्ये बिघाड झाल्याने ती दोन तास बंद होती. तर याच दिवशी मतदानाच्या सुरुवातीला मशीन या सरळ न लावता उलट्या क्रमाने लावल्या होत्या. ही बाब जेव्हा तेथील निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणली त्यावेळेस मशिन सरळ करण्यात आली. तसेच दादोजी कोंडदेव मतमोजणी ही तब्बल तीन तास उशिराने सुरू झाली. कारण की मशीन मध्ये बिघाड होता. त्यानुसार त्यांनीदेखील निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ईव्हीएम मशीनवरुन सेना आक्रमक
By admin | Updated: March 1, 2017 03:37 IST