शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

आरिफ माजिदला देणार मानसोपचार

By admin | Updated: December 3, 2014 03:53 IST

इराकमधील इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेतून परतलेला कल्याणमधील तरुण आरिफ माजिद याने तपास यंत्रणांना दिलेली माहिती उलटसुलट

डिप्पी वांकाणी, मुंबई इराकमधील इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेतून परतलेला कल्याणमधील तरुण आरिफ माजिद याने तपास यंत्रणांना दिलेली माहिती उलटसुलट आणि असंबद्ध असल्याने त्याला मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार देणार असल्याची माहिती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सूत्रांनी दिली. तसेच त्याला तपासादरम्यान घरचे जेवण देण्याची आणि कुटुंबीयांशी भेटण्याची सवलतही देण्यात आली आहे. आरिफने भारतात परत येणे ही आपली मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. आरिफच्या विचारांत मोठी अस्ताव्यस्तता दिसून येत आहे. त्याने दिलेल्या माहितीत मोठी विसंगती आहे आणि तर्कसंगतीचा अभाव आहे. तो बराचसा संभ्रमावस्थेतआहे. त्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञांकरवी उपचार देण्यात येणार आहेत. त्यानंतरच त्याच्या विचारांत सुस्पष्टता आणि तर्कसंगती येईल, असे सूत्रांनी सांगितले. आरिफने सांगितले की, त्याला युद्धक्षेत्रात फुटकळ कामे दिल्याने आणि त्याच्या आईने परत येण्यासाठी भुणभुण लावल्यानेच तो परत आला. पण परत येणे ही त्याच्या मते मोठी चूक होती. इस्लामिक स्टेटला पैशांची कमतरता नसून ते बॉम्ब बनवण्याचे तंत्र मिळवण्यासाठी इंजिनीअर्सना भरमसाठ पैसा देत आहेत. दरम्यान, आरिफच्या काकांना मंगळवारी एनआयएच्या खंबाला हिल भागातील कार्यालयात तपासासाठी बोलावले होते. आरिफला सुनावणीवेळी म्हणणे मांडण्यास मदत घेण्यासाठी कुटुंबीयांतर्फे वकिलाची नेमणूक केली जाईल का, असे विचारता त्यांनी नाही असे सांगितले.