शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या भावासाठी रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट बघताय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 04:23 IST

राज्यात समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे.

नागपूर : राज्यात समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट बघत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनाचे पडसाद दुसºया दिवशीही सभागृहात उमटले. या अनुषंगाने नियम ९७ अन्वये उपस्थित अल्पकालीन चर्चेत विरोधकांनी आक्रमक भूमिका मांडली. देशातील पहिला शेतकरी संप राज्यात झाला. मार्च महिन्यात मुंबईच्या विधानभवनावर शेतकºयांचा पायी मोर्चा आला होता. आता शेतकºयांना रस्त्यावर दूध ओतावे लागत आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकºयांना न्याय द्यायचाच नाही, असे सरकारने धोरण ठरवले आहे काय असा सवाल मुंडे यांनी केला. सरकारने २६ जून २०१७ रोजी गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३६ रुपये भाव जाहीर केला. मात्र, शेतकºयांना केवळ १७ रुपये भाव मिळत आहे. घोषणा करून दूध उत्पादकांचे पोट भरणार नाही. तर दुधाला प्रति लिटर ५ रुपये तर दूध भुकटीला ५० रुपये अनुदान देण्याची मागणी मुंडे यांनी केली. विरोधकांनीही हा प्रश्न लावून धरला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले. दुग्धविकास राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कालच्या शेतकरी दुधात पाणी टाकतात या वक्तव्याचा समाचार घेताना सरकारला शेतकºयांच्या वेदना समजत नाहीत. दुधातले पाणी कसे दिसते? असा सवाल केला. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना एका दूध उत्पादक शेतकºयाने फोन केल्यानंतर त्या शेतक ºयाच्या ५५ वर्षाच्या वडिलांना जेलमध्ये टाकण्याचा, चौकशी करण्याच्या कृतीचाही त्यांनी समाचार घेतला. नीलम गोºहे म्हणाल्या, बाहेरील राज्यातून येणाºया दुधाला राज्य सरकारने लिटरमागे तीन रुपये कर लावावा. तरच राज्यातील दूध संस्थांना स्पर्धा करता येईल. विनायक मेटे यांनी दूध माफियावर नियंत्रण घालण्याची मागणी केली. रामहरी नुपवर यांनी दूध उत्पादकांचा संप मिटावा यासाठी सरकारने अनुदानाची घोषणा करावी अशी मागणी केली.>मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक घ्याराज्यात दूध उत्पादकांचे आंदोलन सुरू असतानाही दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर ठोस निर्णयाची घोषणा केली नाही. अखेर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची दोन दिवसात बैठक बोलवा, यात शेतकºयांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करा, असे निर्देश दिले.

 

टॅग्स :milkदूध