नारायण जाधव, ठाणेवाशी रेल्वे स्थानकानजीक ३० हजार ६०० चौरस मीटरचा कोट्यवधींचा भूखंड के. रहेजा कॉर्पला विनानिविदा कवडीमोल दराने देण्याचा सिडकोचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द ठरविला़ हा विस्तीर्ण भूखंड येत्या सहा महिन्यांत मूळ स्वरूपात सिडकोला परत करण्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात बजाविल्याने त्यावर बांधलेला नवी मुंबईतील सर्वांत मोठा ‘इन आॅर्बिट शॉपिंग मॉल’ आणि ‘फोर पॉइंट’ हे फाइव्ह स्टार हॉटेल आता के. रहेजा कॉर्पला जमीनदोस्त करावे लागणार आहे़ मुंबई उच्च न्यायालयाचे न्या़ अभय ओक आणि गडकरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़वाशी रेल्वे स्थानक आणि लगतचा सेक्टर-३० परिसर राज्य शासनाने आयटी झोन म्हणून घोषित केला आहे़ या परिसरात अगदी रेल्वे स्थानकाला लागून असलेला सुमारे ३० हजार ६०० चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंड बाजारभाव २५ ते ३० हजार रुपये प्रति चौरस मीटर असताना के. रहेजा कॉर्पला अवघ्या १०,२५० रुपये दराने सिडकोने विनानिविदा दिला होता़ सिडकोने ज्या वेळी हा भूखंड विकला, त्या वेळी आयटी पार्कव्यतिरिक्त इतर वापराचा अवघा एक चटईक्षेत्र असलेला भूखंड निविदा पद्धतीने २५ ते ३० हजार रुपये प्रति चौरस मीटर दराने विकला होता़ मात्र, आयटी पार्कसाठी तीन चटईक्षेत्र असलेला भूखंड सिडकोने अवघ्या १० हजार रुपये दराने तो विनानिविदा दिला होता़ यात सिडकोचे १०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज तेव्हा वर्तविण्यात आला होता़ याच भूखंडावर रहेजा कॉर्पने वापरात बदल करून त्या ठिकाणी इन आॅर्बिट हा सर्वात मोठा शॉपिंग मॉल आणि फोर पॉइंट हे नवी मुंबईतील सर्वात पहिले फाइव्ह स्टार हॉटेल बांधले़ शिवाय, उद्यानासाठी राखीव असलेल्या ५९२० मीटर भूखंडावरदेखील अतिक्रमण केल्याने त्यासंदर्भात शहरातील दुसरे माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनीही सिडकोला न्यायालयात खेचले होते़
‘इन आॅर्बिट’ धोक्यात?
By admin | Updated: November 22, 2014 03:16 IST