शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

नियुक्ती शिक्षकाची; काम लेखनिकाचे

By admin | Updated: March 4, 2016 00:47 IST

महापालिका शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या काहीजणांना शिक्षण मंडळ कार्यालयात ‘पर्यवेक्षक’ या पदावर आणून त्यांच्याकडून लेखनिकांची; तसेच अन्य व्यवस्थापकीय कामे करून घेण्यात येत आहेत.

पुणे : महापालिका शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या काहीजणांना शिक्षण मंडळ कार्यालयात ‘पर्यवेक्षक’ या पदावर आणून त्यांच्याकडून लेखनिकांची; तसेच अन्य व्यवस्थापकीय कामे करून घेण्यात येत आहेत. त्यांच्या मूळ जागेवर कंत्राटी शिक्षक नियुक्त करून त्यांच्याकडून काम भागविले जात असल्याने गरीब विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होत आहे.पर्यवेक्षक म्हणून विविध शाळांमधून शिक्षण मंडळात आणलेल्या या शिक्षकांपैकी बहुतेकजण बीएससी, बी.एड., एमएससी. एम.एड. असे उच्च विद्याविभूषित आहेत. श्रीमती शां. बा. ढोले पाटील विद्यालय, सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय, बा. स. कन्या विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, रफी अहमद विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय अशा शाळांमध्ये त्यांच्या शिक्षक म्हणून नियुक्त्या आहेत. इंग्रजी, गणित तसेच शास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. याच विषयांमध्ये महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी कमी पडतात. त्यांची या विषयांची तयारी करून घेण्याची जबाबदारी याच शिक्षकांची आहे.असे असताना त्यांना ‘पर्यवेक्षक’ अशी जबाबदारी देऊन शिक्षण मंडळ कार्यालयात आणण्यात आले. त्यांच्या मूळ जागेवर करार पद्धतीने शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता व शिक्षक असतानाही पर्यवेक्षक म्हणून लेखनिकांचे काम करणाऱ्यांची शैक्षणिक पात्रता यात बराच फरक आहे. साहजिकच त्याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. करार पद्धतीने काम करणाऱ्यांना कमी वेतनात शिकवण्याचे काम करावे लागत आहे, तर कायम शिक्षकाचे वेतन घेऊनही पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झालेले लेखनिकांचे काम करीत आहेत. शिक्षक म्हणून त्यांचे वेतन सरकारी अनुदानातून होते व ज्या कामासाठी त्यांना हे वेतन मिळते, त्याच कामासाठी पालिका करार पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना पुन्हा वेतन देत असते. एकाच कामासाठी दोन व्यक्ती नियुक्त करून, त्यांना वेतन अदा करण्याचा हा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहे. ‘पर्यवेक्षक’ म्हणून शिक्षण मंडळात नियुक्ती झालेल्यांनी काय काम करायचे, हे निश्चित नाही. प्रशासकीय कामात सतत हस्तक्षेप करणे, शिक्षकांना बदल्यांबाबत वेठीस धरणे, काही शिक्षकांना मानसिक त्रास देणे असे प्रकार त्यांच्याकडून होत असल्याच्या तक्रारी शिक्षण मंडळाला मिळाल्या आहेत. त्यांच्यातील काहींना राजकीय, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचेही या तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्या सर्वांना त्यांच्या मूळ जागेवर पाठवावे, अशी मागणी होतआहे. (प्रतिनिधी)