- राज्य मराठी विकास संस्थामुंबई : राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अखेर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर करण्यात आलेल्या या नियुक्तीत एकूण २१ सदस्यांची निवड केली आहे. या सदस्यांचा कालावधी ३ वर्षांपर्यंत असणार आहे.मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक डॉ. शामा घोणसे, ललित लेखक लक्ष्मीनारायण बोल्ली, मानवविद्या तज्ज्ञ डॉ. विनय सहस्रबुद्धे, तंत्रज्ञान तज्ज्ञ दीपक घैसास, कृषिविज्ञान तज्ज्ञ राजेंद्र दहातोंडे, राज्याबाहेरील मराठी प्राध्यापकांचे प्रतिनिधी अरुण यार्दी, शिक्षण तज्ज्ञ रेणू दांडेकर, प्रसारमाध्यम प्रतिनिधी अमर हबीब, लोकसंस्कृती तज्ज्ञ नंदेश उमप, जागतिक मराठी परिषदेचे रेखा दिघे, चित्रपट-रंगभूमीचे प्रतिनिधी कौशल इनामदार आणि अन्य सदस्यांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ७ सप्टेंबर २००६च्या शासननिर्णयाप्रमाणे राज्य मराठी विकास संस्थेच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती २००९ सालापर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप नवीन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली नव्हती.
अशासकीय सदस्यांची नियुक्ती
By admin | Updated: October 20, 2015 03:01 IST