शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
2
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
3
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
4
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
5
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
6
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
7
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
8
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
9
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
10
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
11
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
12
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
13
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
14
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
15
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
16
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
17
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
18
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
19
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
20
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर

प्रकाश गंगाधरे यांचा सुरक्षेसाठी अर्ज

By admin | Updated: October 19, 2016 02:00 IST

मुलुंड शिवसेना-भाजपा राडाप्रकरणानंतर भाजपा कार्यकर्ते धास्तावल्याचे काहीसे चित्र पूर्व उपनगरात निर्माण झाले

मनीषा म्हात्रे,

मुंबई- मुलुंड शिवसेना-भाजपा राडाप्रकरणानंतर भाजपा कार्यकर्ते धास्तावल्याचे काहीसे चित्र पूर्व उपनगरात निर्माण झाले आहे. सोमय्यांपाठोपाठ सुधार समिती अध्यक्ष आणि भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनीदेखील मुंबई पोलीस आयुक्तांकडे जिवास धोका असल्याची भीती वर्तवली आहे.पालिकेच्या रावण दहनावरून पेटलेल्या सेना-भाजपा राड्यानंतर पूर्व उपनगरातील चित्र पालटले आहे. दसऱ्याच्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांवर हल्ला चढविला. त्यानंतर, झालेल्या राड्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले. सोमय्या यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. अशात पोलिसांनी दबावापोटी पक्षपाती भूमिका घेत, फक्त सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुरुवातीला पाच जणांना अटक केली. तेव्हा पोलिसांनी जामीनपात्र कलमांतर्गत ही कारवाई केली होती. त्यानंतर, सोमय्या यांच्यासह भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशाने या कलमात ३२४ बरोबरच भादंवि ३२६ या कलमाची भर पडली. रातोरात सेनेच्या आणखीन ९ नेत्यांना गोड बोलून पोलिसांनी जाळ्यात ओढले. ३२६ कलमाची वाढ झाल्याने, मुलुंड न्यायालयाने अटक शिवसैनिकांचा जामीन फेटाळला. या वेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे भाजपाचा एकही कार्यकर्ता येथे फिरकलादेखील नाही. येथून त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. यामध्ये सेनेच्या उपविभाग अध्यक्षांसह शाखाप्रमुखांचा समावेश आहे. अद्याप त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. सेनेचे पदाधिकारी क्रॉस केससाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिवसेना कार्यकर्ते संतापले आहेत. अटक झालेले शिवसेनेचे पदाधिकारी बाहेर आल्यानंतर काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय अद्याप सेनेचे बडे नेते समोर आले नाहीत. त्यामुळे शांत राहून ते काहीतरी विचार करत असल्याची भीतीही भाजपा नेत्यांना सतावत आहे. सोमय्यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानंतर त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली. सोमवारी सुधारसमिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनीदेखील पोलीस आयुक्तांना जिवास धोका असल्याबाबत पत्र लिहिले आहे. गेले दोन दिवस धमकीचे फोन येत आहेत. शिवाय काही मंडळी कार्यालयाबाहेर संशयास्पद फिरत असून मला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. >निवडणुकांसाठी गल्लोगल्ली फिरावे लागतेगंगाधरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वस्त्यांसह गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. या प्रकरणानंतर कोणीही आपल्यावर हल्ला चढवू शकते, अशी भीती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुलुंड सहायक पोलीस आयुक्तांना कळविले. त्यानंतर, आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी त्यांची भेट शक्य झाली नाही. त्यामुळे बुधवारी त्यांना लेखी पत्र देण्यात येणार आहे.