स्नेहा मोरे - मुंबई
बालमजुरी, लहान मुलांचे अपहरण करून त्यांचे शोषण करणो, बालतस्करी रोखण्यासाठी आता तुम्ही ‘स्मार्ट’ पद्धतीने पुढाकार घेऊ शकता. ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी दोन तरुणांनी ‘हेल्पिंग फेसलेस’ हे अँड्रॉइड मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे.
रस्त्यावर भीक मागताना दिसणा:या अनेक चिमुकल्यांचे अपहरण करून त्यांना या दुष्टचक्रात ढकलण्यात आलेले असते. या मुलांना त्यांच्या पालकांर्पयत पोहोचविणो व त्यांना आशादायी भविष्य मिळवून देणो ही दोन मुख्य उद्दिष्टय़े अॅपच्या निर्मितीमागे असल्याचे हे अॅप तयार करणारे शशांक सिंग आणि अमोल गुप्ता यांनी सांगितले.
दिल्लीत कॉम्प्युटर सायन्स शाखेचा विद्यार्थी असणारा शंशाक सांगतो, की रस्त्यावर भीक मागणारी मुले दिसल्यास त्यांचे छायाचित्र काढून या अॅपच्या मदतीने अपलोड करण्यात येईल. हरवलेल्या मुलांच्या नावाच्या व छायाचित्रंच्या आधारे या मुलांची पडताळणी करण्यात येईल. तसेच या मुलांची माहिती लहान मुलांसाठी कार्यरत असणा:या सामाजिक संस्थांनाही पुरविण्यात येईल. या प्रक्रियेत मुलांचे पालक सापडल्यास आणि मुलांची ओळख झाल्यास जवळच्याच सामाजिक संस्थेशी संपर्क साधून त्यांची आणि पालकांची भेट घडवून दिली जाणार आहे. अॅपच्या वैशिष्टय़ांबद्दल अमोल गुप्ता सांगतो, की अॅपमध्ये बालतस्करी आणि बालमजुरीशी निगडीत कायद्यांचीही माहिती देण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी मुंबईत दोघांसोबत 2क् स्वयंसेवक आणि 4 गट सदस्य काम करीत आहेत.
..आणि त्याची सुटका झाली!
‘हेल्पिंग फेसलेस’ या अॅपचा निर्माता शशांक सिंग हा तरुणही याच दुष्टचक्रातून गेलेला आहे. लहानपणी झालेले अपहरण, त्यांनतर एका अनोळखी व्यक्तीने त्याची केलेली सुटका हा अनुभव सांगतानाही त्यातील थरार त्याच्या डोळ्य़ांत दिसत होता. मात्र त्याची यातून सुटका झाली़ त्यानंतर मोठे होऊन समाजाचे ऋण फेडण्यासाठी या मुलांसाठी अॅपची निर्मिती केल्याचे त्याने सांगितले.