मुंबई : यंदा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये फेररचना हा स्थानिकांच्या चर्चेचा विषय आहे. या फेररचनेमुळे तिकिटांसाठी इच्छुकांची ‘पळापळा’ सुरू आहे. परिणामी पक्ष कोणताही असो, मात्र निवडणुकांमध्ये आपल्याच उमेदवाराला निवडून देण्याची खूणगाठ स्थानिक ज्येष्ठांनी बांधल्याचे चित्र एल वॉर्डातील प्रभाग क्रमांक १६७ मध्ये दिसून येत आहे.कुर्ला भागात स्थानिकांच्या अडचणींची प्रश्नावली संपत नाही. यातच निवडणुकींच्या तोंडावर आश्वासनांचे ‘गाजर’ दाखवत निवडणुकीनंतर प्रत्यक्षात उपाशी राहिल्याचे अनुभव नवे नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एल वॉर्डमधील प्रभाग १६७ मध्ये मुस्लीम लोकवस्ती अधिक आहे. त्याचबरोबर विनोबा भावे नगर, बुद्ध कॉलनीतील मतदाते निर्णायक भूमिका बजावू शकतात. मात्र अशा परिस्थितीतही पक्षाला न पाहता उमेदवार पाहूनच मतदान करण्याचा निर्णय परिसरातील ज्येष्ठांनी घेतला आहे.शिवसेनेने केलेल्या ५०० फुटांपर्यंत घरे मालमत्ता करमुक्त करण्याच्या घोषणेची चर्चा या प्रभागात सुरू आहे. व्होट बँक समजल्या जाणाऱ्या विशिष्ट भागांमध्ये, नाक्या-नाक्यावरील मंडळी या विषयावर आपली मते व्यक्त करत आहेत. या परिस्थितीतही आपला उमेदवार असेल तरच त्याला मत देत विजयी करायचे. मग पक्ष कोणता का असेना, असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतल्यामुळे ‘पार्टी कोई भी हो आदमी देखने के बाद हिसाब होगा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
पार्टी कोई भी हो ‘अपना’ ही जितेगा
By admin | Updated: January 21, 2017 03:00 IST