शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ देणार नाही- संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:46 IST

 एकमेव ग्रीन झोन असलेला आरे विभाग मी एक मुंबईकर म्हणून त्याला वाचवणार आहे. मी आरे बचाव चळवळीमध्ये सामील झालेलो आहे. कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ देणार नाही. मी मुंबईकरांना आवाहन करतो की सगळ्यांनी आरे बचाव चळवळीमध्ये सहभागी व्हा. आरेमध्ये मेट्रो कार शेड हा मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा घोटाळा आहे.

मुंबई, दि. 8 - एकमेव ग्रीन झोन असलेला आरे विभाग मी एक मुंबईकर म्हणून त्याला वाचवणार आहे. मी आरे बचाव चळवळीमध्ये सामील झालेलो आहे. कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ देणार नाही. मी मुंबईकरांना आवाहन करतो की सगळ्यांनी आरे बचाव चळवळीमध्ये सहभागी व्हा. आरेमध्ये मेट्रो कार शेड हा मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा घोटाळा आहे.आम्ही मागील पत्रकार परिषदेत आरेतील जागा ही वनजमीन असल्याचे सर्व पुरावे सादर केल्यावर लगेचच मुख्यमंत्र्यानी चलाखी करून हि जागा नो डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित केली. म्हणजे तिथे ते भविष्यात व्यावसायिक बांधकाम करू शकतात. ही जागा बिल्डरांना व्यावसायिक बांधकामासाठी देण्याचा एक मोठा घोटाळा आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून किंवा मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनकडून कोणतेही ठोस उत्तर देत नाहीत. कोणतेही कागदपत्रे दाखवत नाहीत. भविष्यात गरज पडली तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला घेराव घालू. तरी ही मेट्रो यार्डचे काम सुरू झाले, तर गांधीवादी पद्धतीने आंदोलन करू. जनतेची मोठी चळवळ उभी करू. पण मेट्रो यार्ड होऊ देणार नाही, असे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पत्रकार परिषदेत म्हणाले. या पत्रकार परिषदेला आरे बचाव चळवळीचे अम्रिता भट्टाचार्य, स्टॅलिन, झोलू सहीत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.संजय निरुपम म्हणाले की या सरकारने आरे सोडून कांजूरमार्ग, कुलाबा, कालिना, महालक्ष्मी रेसकोर्स येथे कुठे ही मेट्रो यार्ड उभारावे. मेट्रो रेलला आमचा पाठिंबा आहे. परंतु आरेमध्ये आम्ही मेट्रो यार्ड होऊ देणार नाही.आरे बचाव चळवळीचे स्टॅलिन म्हणाले की, आम्ही गेली अनेक वर्षे मुख्यमंत्री कार्यालय व मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कार्यालयाचा पाठपुरावा करत आहे. परंतु काहीच ठोस उत्तर किंवा कागदपत्रे आम्हाला देत नाहीत. फक्त माहितीच्या अधिकारातून आम्हाला सर्व कागदपत्रे मिळत आहेत. हे सरकार कधी सांगतात २५४ झाडे कापणार, कोर्टात सांगतात २२९८ झाडे कापणार प्रत्यक्षात मात्र ३८५१ झाडे कापायचे टेंडर काढतात. हे सरकार सामान्य जनतेशी, आमच्याशी व कोर्टाशीही खोटे बोलत आहे. प्रत्येक वेळी कोर्टात वेगवेगळे खुलासा देतात.वर्तमानपत्रातील जाहिरातीत वेगळे लिहितात. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा आम्हाला आश्वासन दिले की मी सर्व नियमानुसार करीन आणि त्याची कागदपत्रे तुम्हाला देऊ. परंतु त्यांनी अजून असे काहीच केलेले नाही. ते फक्त वेगवेगळे ट्विट करतात. हे सरकार आरेची वाट लावणार आहेत. ही मुख्यमंत्री आणि मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनची मोठी खेळी आहे. आम्हाला आता नवीन माहिती मिळाली आहे की हा घोटाळा ३३ हेक्टरचा नसून १६५ हेक्टरचा आहे. या सरकारने १६५ हेक्टर जागा ही नो इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करणार आहे म्हणजे भविष्यात ते तिथे काहीही करू शकतात.