शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: March 24, 2016 01:22 IST

राष्ट्रीय फळ उत्पादन योजनेंतर्गत शेतात शेड नेट हाऊस उभारून शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने मुख्य सूत्रधाराचा अटकपूर्व जा

नागपूर : राष्ट्रीय फळ उत्पादन योजनेंतर्गत शेतात शेड नेट हाऊस उभारून शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने मुख्य सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावता. अभिजित निशिकांत महाजन (४४) रा. गोविंदनगर जरीपटका, असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील फिर्यादी मंगेश मोतीराम जपुलकर रा. तितूर यांच्या तक्रारीवरून २ मार्च २०१६ रोजी दिशा ग्रीन हाऊसचे मालक पांडुरंग रघुनाथ महाजन, कुंदन पांडुरंग महाजन दोन्ही रा. यावला , बायोनिक्स कंपनीचे मालक अभिजित निशिकांत महाजन आणि उमरेडच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४०६, ४०९, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण असे की, नोव्हेंबर २०१२ ते जुलै २०१४ या दरम्यान तितूर आणि अडम शिवारातील मंगेश जपुलकर आणि इतरांच्या शेतात आरोपींनी ग्रीनहाऊस आणि पॉलिहाऊसच्या प्रकल्पासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवले, बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून आरोपींनी एस्टीमेटप्रमाणे साहित्याचा पुरवठा न करता जपुलकर आणि इतर शेतकऱ्यांची ७४ लाख ५५ हजार रुपयांनी फसवणूक केली. जपुलकर यांची तितूर येथे १०.६८ हेक्टर आर शेती आहे. त्यांची आई आणि वडील यांच्या नावाने २ पॉलिहाऊस व ३ नेट शेड तसेच रत्नाकर रामूजी भजनकर यांच्या अडम येथील ७ एकर शेतात पॉलिहाऊस आणि नेट शेड उभारण्याचा करार या आरोपींसोबत झाला होता.प्रत्यक्षात आरोपींनी अर्धवट नेट शेड आणि पॉलिहाऊस उभारले होते. त्यासाठी अर्धवट फाऊंडेशन तयार करण्यात आले होते. पुरवण्यात आलेली नेटशेडची नेट, जी.आय . पाईप, फाऊंडेशन साहित्य, पॉलिहाऊसच्या फिल्म आणि कॉपर वायर निकृष्ट दर्जाचे होते. २५ वर्षांची गॅरंटी असतानाही एक वर्षातच वाऱ्याने जी. आय. पाईप वाकले आणि तुटले, नेटशेडचे नेट फाटून फाऊंडेशन उखडले. बायोनिक्सचे मालक आरोपी अभिजित महाजन याने शेणखत, लालमाती, धानाचा कोंडा पुरवण्याचे कंत्राट घेतले होते. त्यासाठी त्याला ८ लाख रुपये देण्यात आले होते. त्याने आॅक्टोबर २०१३ मध्ये ४ ट्रक लालमाती पुरवली होती. तीही निकृष्ट होती. उर्वरित लाल माती, धानाचा कोंडा आणि शेणखत न पुरवता त्यांनी फसवणूक करून विश्वासघात केला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील डी. एम. पराते यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)