शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चोकसीविरुद्ध आणखी एक गुन्हा; पसार होण्यापूर्वी बोरीवलीचा प्रकल्प विकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:15 IST

पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या फसवणूकप्रकरणी गेल्या वर्षी जून महिन्यात ईडीने चोकसीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मनीषा म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या गीतांजली समूहाच्या मेहुल चोकसीविरुद्ध मुंबईत आणखी एक गुन्हा सोमवारी दाखल झाला. पंजाब नॅशनल बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, बोरीवलीतील बांधकाम प्रकल्पाची परस्पर विक्री करून तो परदेशात पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्याने साडेसदतीस कोटींची फसवणूक केली आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या फसवणूकप्रकरणी गेल्या वर्षी जून महिन्यात ईडीने चोकसीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ त्याच्या मुंबईसह देशातील संपत्तीवर जप्ती आणण्यास सुरुवात केली. त्यात बोरीवलीतील दत्तपाडा येथील बांधकाम प्रकल्पही सील केला.धक्कादायक म्हणजे, चोकसीने हाच प्रकल्प लक्ष्मी ग्रुप आॅफ कंपनीला विकून त्यांची ३७ कोटींना फसवणूक केली. कंपनीचे फायनान्स मॅनेजर भावीन चंद्रकांत शहा (३४) यांच्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी चोकसीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शहा यांच्या तक्रारीनुसार आॅगस्ट २०१७ मध्ये चोकसीने कंपनीच्या अध्यक्षांशी संपर्क साधून, बोरीवलीतील बांधकाम विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला गजेरा यांनी नकार दिला. त्यानंतर प्रकल्पातून जास्तीच्या नफ्याची आशा दाखवून चोकसीने त्यांना जाळ्यात ओढले. त्यांच्यावर विश्वास ठेवून लक्ष्मी ग्रुपने प्रकल्पाची पाहणी केली. तेव्हा, चोकसीही हजर होता. तत्त्व रेसिडेन्शियल प्रकल्पाच्या दोन इमारतींचे आरसीसी बांधकाम झाले होते. आतील काम अर्धवट होते. २९ कोटी ९० लाखांना प्रकल्प खरेदी करण्याचे ठरले. त्यानुसार, त्यांनी चोकसीला पैसे दिले.

ठरल्याप्रमाणे गेल्या वर्षी जानेवारीत करारनामा झाला. त्याचा मालकी ताबा मेसर्स लक्ष्मी इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिडेट कंपनीकडे आला. करारनाम्यानुसार १५५ फ्लॅटपैकी १०५ फ्लॅट हे चोकसीने यापूर्वीच ग्राहकांना विकले. उर्वरित ५० फ्लॅट हे लक्ष्मी ग्रुपला मिळणार होते.त्यानुसार, त्यांनी बांधकाम व्यावसायिक नेमून कामाला सुरुवात केली. जवळपास ७ कोटी ३२ लाखांचा खर्च आला. त्यापैकी पावणेपाच कोटी त्यांनी बांधकाम व्यावसायिकाला दिले. यात त्यांची एकूण साडेसदतीस कोटींची फसवणूक झाली.पीएनबी घोटाळ्यातील पैशांतूनच प्रकल्पाची केली खरेदीच्चोकसीने पीएनबी घोटाळ्यातील पैशांतून बोरीवलीतील प्रकल्प खरेदी केला होता. पुढे घोटाळा उघडकीस आल्यानंतर हा प्रकल्प जप्त होऊ शकतो ही माहिती असतानाही त्याने प्रकल्प विकण्याची घाई केली आणि तो परदेशात पसार झाला.च्चोकसीच्या घोटाळ्याची माहिती वृत्तपत्रांतून मिळताच लक्ष्मी ग्रुपने पोलिसांत धाव घेतली. चोकसीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांनी दुजोरा देत या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.