शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात दुसरे कृषी समृद्धी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:36 IST

मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास

- नारायण जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई-नागपूर समृद्धी मार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टाऊनशिपनंतर, आता कल्याण तालुक्यातही एक कृषी समृद्धी केंद्र म्हणजेच टाऊनशिप रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे. हे केंद्र कल्याण तालुक्यातील मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे, आंबिवली तर्फे वासुंद्री येथे उभारण्यात येणार आहे. याबाबत, स्थानिकांकडून नगरविकास विभागाने आता हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.राज्यातील १० जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन संपादनास असणारा शेतकऱ्यांचा विरोध डावलून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातात हात घेऊन, नगरविकास विभागाने या मार्गावरील प्रस्तावित २४ समृद्धी केंदे्र अर्थात, टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील कासगाव, सापगाव, शेलवली, खुटघर, फुगळे, वाशाळा, हिव आणि रास या गावांतील जमिनीवर कृषी समृद्धी केंद्र अर्थात, नवी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी या महापालिकांसह नाशिक शहरापासून ही टाऊनशिप जवळ असल्याने, येथील जागांना सोन्याचे भाव आले आहेत.या भागात टाऊनशिप येणार असल्याचे आधीच माहीत असल्याने, मंत्रालयातील अनेक सनदी अधिकाऱ्यांनी येथे नातेवाईकांच्या नावे जमिनी विकत घेऊन ठेवल्याचा आरोप करून, शहापूर तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, त्यांचा विरोध डावलून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी, नागपूरपाठोपाठ ठाणे शहरातही शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदीखतावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर, लगेच आता कल्याण तालुक्यात आणखी एक कृषी समृद्धी केंद्र प्रस्तावित केले आहे.प्रत्येकी ५०० हेक्टरची एक टाऊनशिपया संपूर्ण मार्गावर एकूण २४ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दोन कृषी समृद्धी केंद्रांतील अंतर साधारणत: २० ते ४० किमी राहणार असून, प्रत्येकाचे क्षेत्र ४०० ते ५०० हेक्टर राहणार आहे. त्या ठिकाणी गरज आणि संभाव्य क्षमता लक्षात घेऊन, कृषिपूरक उद्योग, पर्यटन, शैक्षणिक सुविधा केंद्र, वैद्यकीय सुविधा निर्माण करून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय फूड मॉल, पेट्रोलपंप, मनोरंजन मॉल, शीतगृह, वखारींची साखळी आणि सर्वांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. यावर, टाऊनशिपमधील पायाभूत सुविधांवर रस्ते विकास महामंडळाने २४०० कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे.