शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

पोलिसांच्या छळाचे आणखी एक प्रकरण

By admin | Updated: May 3, 2015 04:58 IST

मॉडेल आणि तिच्या मित्राकडून पोलिसांनी कशा चलाखीने पैसे उकळले, यासंबंधीचे ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर अशा प्रकारे मॉडेल प्रकरणातील

डिप्पी वांकाणी, मुंबई मॉडेल आणि तिच्या मित्राकडून पोलिसांनी कशा चलाखीने पैसे उकळले, यासंबंधीचे ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर अशा प्रकारे मॉडेल प्रकरणातील पोलिसांनी दमदाटी आणि मारहाण करून लुटल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. मॉडेल प्रकरणात पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी कारवाई केली. तथापि पत्रांतून आपबिती मारिया यांना कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप जयराम झागडे यांनी केला आहे.जयराम झागडे यांचे असे म्हणणे आहे, की ३० डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी एपीआय सुरेश सूर्यवंशी आणि अन्य पाच जण माझ्या दुकानात आले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला की, एका इसमाने ७० ग्रॅम चोरीचे सोने तुम्हाला विकले. त्यावर मी म्हणालो की, ती व्यक्ती माझ्याच भागात राहत असल्याने मी त्या व्यक्तीला ओळखतो. त्याने फक्त ३८ ग्रॅम सोने मला विकले. त्याची खरेदी पावती देण्याची हमी त्याने दिली होती. सोने विकणाऱ्या व्यक्तीने अगदी कळवळून सांगितले की, माझी आई आजारी आहे. तिला इस्पितळात दाखल करण्याते आले असून, उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे. इस्पितळातून आईला सुटी मिळाल्यानंतर सोने खरेदीची पावती देईल. तो माझ्याच भागात राहत असल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्याकडून ३८ ग्रॅम सोने विकत घेतले. सूर्यवंशीने मला साकीनाका पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केली आणि ७० ग्रॅम सोने आणि ५० हजार रुपये मागितले. पैसे दिले नाही तर अंधेरीत घडलेल्या सोने चोरीच्या १८ प्रकरणांत गुन्हा दाखल करीन, अशी धमकीही दिली. मी जाम घाबरलो. सूर्यवंशीला ७० ग्रॅम सोने आणि पैसे देऊन मोकळा झालो. तथापि, हे प्रकरण येथेच थांबले नाही. ४ जानेवारीला सूर्यवंशीने मला बोलावून मी दिलेले सोने चांगल्या प्रतीचे नसल्याचे सांगत ७ ग्रॅम २४ कॅरेटच्या सोन्याची मागणी केली. आता काय करावं? मला काही सुचत नव्हतं. एकाने मला एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पत्र लिहून हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी ८ जानेवारी रोजी सूर्यवंशीविरुद्ध एसीपी, डीसीपी आणि पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. २० मे रोजी सूर्यवंशीने झागडे यांना अटक केली. पोलीस कोठडीत त्याने पुन्हा ७० ग्रॅम सोन्याची व्यवस्था करण्यास सांगितले. आता मला शक्य नाही, असे मी सांगितल्यानंतर सूर्यवंशी ६० आणि ४० ग्रॅमनंतर १० ग्रॅमवर आला. पोलीस कोठडीत असताना त्याने माझा मोबाइल आणि अन्य चीज वस्तूही काढून घेतल्या, असे झागडे यांनी सांगितले. या प्रकाराबाबत मी पुन्हा १३ मार्च रोजी आयुक्त राकेश मारिया यांना पत्र लिहिले. सूर्यवंशी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मॉडेलच्या मित्राकडून कसे पैसे उकळले, याचे वृत्त माझ्या वाचण्यात आल्यानंतर मलाही असे वाटले की, माझी आपबिती इतरांना सांगायला हवी. मारिया यांच्याशी संपर्क साधून माझ्या पत्रांची दखल का घेतली नाही, असे विचारले असता मारिया म्हणाले की, दररोज हजारो पत्रं येतात. माझ्या नावाने आलेले पत्रच माझ्याकडे येते, असे सांगून माझी बोळवण केली, असे झागडे यांनी सांगितले.