शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 5:17 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीतबारावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधीमध्ये होणार सोशल मिडीयावरून प्रसारीत झालेले वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी ग्राहय धरू नये

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधीमध्ये पार पडेल तर बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च  २०१९ या कालावधीमध्ये होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीचे विद्यार्थी, शिक्षक यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जावे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा यादृष्टिने संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. मंडळाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे संभाव्य आहे, परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळांकडून जे छापील वेळापत्रक पाठविले जाईल ते अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेणे आवश्यक आहे. इतर क्लासेस यांनी छपाई केलेले, सोशल मिडीयावरून प्रसारीत झालेले वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी ग्राहय धरू नये असे आवाहन भोसले यांनी केले आहे. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा यांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व महाविद्यालयांना कळविले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून १० वी करिता पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनपर्रपरीक्षार्थ्यांकरीता अंतिम संधी असलेल्या जुन्या अभ्यासक्रमांचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले आहे असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. .

टॅग्स :examपरीक्षा