पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील वर्षी घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्च तर दहावीची परीक्षा १ ते २९ मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासाचे नियोजन करता यावे या उद्देशाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच राज्य मंडळातर्फे वेळापत्रक जाहीर केले जात होते. मात्र, यंदा मार्च २०१५मधील परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-आॅगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यामुळे यंदा शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होऊन सुमारे ३ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर राज्य मंडळाने ६६६.ेंँंँ२२ूुङ्मं१.िेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. परंतु, परीक्षेपूर्वी शाळा, महाविद्यालयांना दिले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम असेल. जुलै-आॅगस्ट महिन्याचे वेळापत्रक आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक एकाच वेळी प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असता. त्याचप्रमाणे बारावीच्या वेळापत्रक नवीन व्होकेशनल विषयांच्या अंतर्भाव करायचा होता. त्यामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी वेळापत्रक प्रसिद्ध केले नाही, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधार म्हमाणे म्हणाले.
दहावी-बारावीचे नियोजित वेळापत्रक जाहीर
By admin | Updated: September 4, 2015 01:11 IST