ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै- ऑगस्ट 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.30) दुपारी 1 वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य मंडळातर्फे गेल्या वर्षापासून दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. यंदा 18 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये नापास विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. मंडळातर्फे www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल प्रसिध्द केला जाणार असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रिंट आऊट घेता येईल. मुळ गुणपत्रिकेच्या वाटपाबाबत स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.