शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:25 IST

महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरणाची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी केली. नवीन धोरणानुसार कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरणाची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी केली. नवीन धोरणानुसार कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे.कृषी विभागाच्या योजना या कृषी पर्यटन केंद्रांना मंजूर करण्यात येतील. कृषी पर्यटन केंद्र उपक्रमासाठी शेतजमिनीचा उपयोग किंवा वापर करण्यासाठी अकृषक वापर परवानगी घेण्याची गरज नसेल. कृषी पर्यटन केंद्रांना वीज, पाणी इत्यादी सुविधा शेतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात येतील, असे रावल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठी बँकांकडून अल्प व्याजदराने कर्ज मिळेल.मंत्रालयात आकर्षक प्रदर्शनमहाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांची माहिती दर्शविणारे प्रदर्शन मंत्रालयात भरविण्यात आले आहे. जयकुमार रावल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदी उपस्थित होते.मुंबई-मालदिव क्रूझ २४ नोव्हेंबर रोजीपर्यटन विभाग २४ नोव्हेंबरपाूसन कोचीन - मालदिव दरम्यान पहिले कोस्टा प्रवासी क्रुझ करणार आहे. या क्रुझमधील अनुभव लक्षात घेऊन नंतर श्रीलंका किंवा इतर ठिकाणीही क्रुझसेवा सुरू करण्यात येईल. कार्निव्हल ही क्रुझ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनीही भारतात क्रुझ सेवा सुरू करीत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.विराटवर संग्रहालयराज्यातील इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ई - व्हेईकल झोन सुरू केला जाणार आहे. आयएनएस विराटवर नौदलाचे संग्रहालय स्थापन करण्यात येत आहे. या संग्रहालयाच्या निर्मितीनंतर ते वसई-विरार भागात स्थापित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे.हेरिटेज इमारतींची माहिती एका क्लिकवरमुंबईत ऐतिहासिक इमारतींचा खजिना आहे. देशविदेशातील पर्यटकांना त्यांची माहिती क्यू आर कोडच्या सहाय्याने एका क्लिकवर फोटोसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हर्निमन सर्कलपर्यंत प्राचिन वारसा लाभलेल्या अनेक इमारती आहेत. या इमारतींशी व मुंबईतील या ऐतिहासिक सौंदर्याशी सर्व परिचित व्हावे यासाठी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन विभाग व पर्यटन विकास महामंडळामार्फत बुधवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.