शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सोलापूर, नगरमध्ये दुष्काळ जाहीर

By admin | Updated: March 10, 2016 03:57 IST

दुष्काळाचा फटका बसलेल्या रब्बी हंगामातील १०५३ गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून इतिहासात प्रथमच रब्बी हंगामासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : दुष्काळाचा फटका बसलेल्या रब्बी हंगामातील १०५३ गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून इतिहासात प्रथमच रब्बी हंगामासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ६४५ आणि अहमदनगरमधील ४०८ गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महसूल मंत्री खडसे यांनी विधान परिषदेत याबाबतचे निवेदन केले. मंगळवारी रात्री झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून या दुष्काळी गावांमध्ये सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.अपु-या पावसामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला असून यापूर्वीच खरीपातील १५ हजार ७४७ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. रब्बी हंगामालाही दुष्काळाचा फटका बसला असून पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी असणा-या १०५३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना करण्यात येतील. या सर्व गावांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात माफी, चारा डेपो किंवा छावण्या, आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, शेत पंपांची वीज जोडणी खंडित न करणे आणि रोहयो कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. खरीपातील शेतपिकांच्या नुकसानीपोटी सुमारे २५०० कोटींची मदत शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी २ हजार कोटींची मदत केली जाणार आहे. (प्रतिनिधी)राज्यपालांच्या अभिभाषणात दुष्काळाचा उल्लेखच करण्यात आला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी केला.यावर राज्यपालांच्या भाषणात दुष्काळाचा उल्लेख आहे. भाषनादरम्यान गोंधळ घातला नसता तर ऐकू आले असते, असा टोला खडसे यांनी लगावला.