शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

उच्चस्तरीय समितीचा अहवाल जाहीर करा, एसटी संप प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 04:41 IST

एसटी कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भातील तिढा सोडवण्यास सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल गोपनीय ठेवण्यासारखे काय आहे

मुंबई : एसटी कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भातील तिढा सोडवण्यास सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल गोपनीय ठेवण्यासारखे काय आहे, असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याचिकाकर्ते व एसटी कामगार संघटनांना तो अहवाल देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे.पगारवाढीच्या मुद्द्यावरून ऐन दिवाळीच्या वेळी एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले होते. याविरुद्ध पत्रकार जयंत साटम व अन्य काहींनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे होती.नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयाने एसटी कामगारांचा हा संप बेकायदा ठरवत कामगारांना तत्काळ कामावर रुजू होण्याचा आदेश दिला. तसेच सरकार व कामगार यांच्यामधील वाद सोडविण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचे निर्देश सरकारला देत, या समितीला वेतनवाढीवर अंतरिम तोडगा काढण्याचे निर्देश दिले. तसेच २२ डिसेंबरपर्यंत अहवालही सादर करण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकिलांनी न्यायालयात उच्चस्तरीय समितीचा सीलबंद अहवाल सादर केला. कामगार संघटनांनी हा अहवाल स्वीकारावा, असे एसटी महामंडळाने न्यायालयाला सांगितले. त्यावर कामगार संघटनांच्या वकिलांनी अहवाल न वाचताच स्वीकारणार नाही, असे न्यायालयाला सांगितले. समितीने आमच्या शिफारशी मान्य केल्या की नाही, हेही आम्हाला माहीत नाही. तसेच त्यांनी आमच्या सदस्यांना सुनावणीही दिली नाही, अशा स्थितीत आम्ही हा अहवाल न वाचताच स्वीकारणार नाही, असे कामगारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :ST Strikeएसटी संप