शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

ऐन दिवाळीत चक्काजाम; ६० लाख प्रवाशांचे हाल!, एसटी कर्मचारी संपावर ठाम, मंत्री रावतेंच्या भूमिकेने आंदोलन चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 05:27 IST

दिवाळीला गावी जाणाºया सुमारे ६० लाखांहून अधिक प्रवाशांचे एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे मंगळवारी अतोनात हाल झाले. विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना खासगी वाहनांनी गावी पोहोचताना, अव्वाच्या सव्वा भाडे देण्याबरोबरच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

- महेश चेमटेमुंबई : दिवाळीला गावी जाणाºया सुमारे ६० लाखांहून अधिक प्रवाशांचे एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे मंगळवारी अतोनात हाल झाले. विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना खासगी वाहनांनी गावी पोहोचताना, अव्वाच्या सव्वा भाडे देण्याबरोबरच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेकांना दुर्गम भागात जाण्यासाठी पायपीट करावी लागली. त्यातच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलन चिघळले आहे. कामावर परतण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहनही धुडकावत कर्मचारी संपावरठाम आहेत.संपामुळे १८ हजार बस रस्त्यावर उतरल्याच नाहीत. महामंडळाने केवळ ४ हजार खासगी बस भाड्याने घेतल्याने पर्यायी व्यवस्थाही तोकडी ठरली. तब्बल १८ महिने कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोणतीही हालचाल न केल्याने, कर्मचाºयांनी रावते यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे.कामगारांच्या असंतोषाला ‘काँग्रेस’ कारणीभूत असल्याचे सांगत, रावते यांनी आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. खासगी वाहन चालकांनी प्रवाशांची लूट केली. इंटक, कामगार संघटना, मोटर कामगार फेडरेशन, कनिष्ठ कर्मचारी आणि कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सुमारे एक लाख कर्मचारी संपात सहभागी झाले आहे.एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत चर्चेतून तोडगा काढू. कर्मचा-यांनी कामावर परत यावे. बेस्ट कर्मचारी संपात गरज पडल्यास मी स्वत: हस्तक्षेप करेन.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीएसटी ५० वर्षे तोट्यात आहे. त्यामुळे पुढची २५ वर्षे सातवा वेतन आयोग देणे अशक्य आहे. मात्र काही माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. सातव्या वेतन आयोगाची मागणी अयोग्य आहे. वेतनवाढीसाठी मी तयार आहे. संघटनांनी चर्चेसाठी यावे, मी वेतनवाढ देतो. - दिवाकर रावते, परिवहन मंत्री-एसटीचे अध्यक्षएसटी कर्मचा-यांना ८ ते ९ हजारावर काम करावे लागते़ १९९५ पर्यंत राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी कामगारांचे वेतन समान होते. किमान १८ हजार रुपये वेतन द्यावे. दीड वर्षांपासून आम्ही मागण्यांचा पाठपुरावा करीत आहोत़ वेळोवेळी संपाची नोटीस दिली. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले.- हनुमंत ताटे, सरचिटणीस,एस. टी. कामगार संघटनापरिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने भाजपाने जाणीवपूर्वक आंदोलनाबाबत उदासीन भूमिका तर घेतली नाही ना, अशी शंका विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे.आज कामावर रुजू व्हाबुधवारी कामावर रुजू व्हा, अन्यथा बडतर्फ करू, असे आदेश एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिले आहेत.22कोटींचा एका दिवसात फटकासंपामुळे मंगळवारी एसटीचे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. गेल्या दिवाळीत महामंडळाला सुमारे ८०-९० कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

खासगी वाहन मालकांकडून लूट

मार्ग आकारलेले दर (रुपये)पुणे-जालना ३५००पनवेल-पुणे ५००नाशिक-अहमदनगर ८००मुंबई-पुणे १२००

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार