शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा: फाईल चोरी प्रकरणी महाव्यवस्थापक नागेश जुंबाडे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:49 IST

गुन्हे तपास यंत्रणेने (सीआयडी) यापूर्वीच या घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स व कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली होती.

मुंबई: दहिसर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून महत्त्वपूर्ण फाईल्स चोरी झाल्याप्रकरणी शुक्रवारी राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महामंडळाचे व्यवस्थापक नागेश जुंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 28 तारखेला झालेल्या या चोरीनंतर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याचाही खुलासा केला. गुन्हे तपास यंत्रणेने (सीआयडी) यापूर्वीच या घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स व कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली होती. त्यामुळे या कार्यालयात अन्य फायली व संगणक वगळता फार काही नव्हते, असा दावा दिलीप कांबळे यांनी केला. सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही चार मजली इमारत असून त्याच ठिकाणी २०१५ पर्यंत साठे महामंडळाचे कार्यालय होते. महामंडळाचे सर्व रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले आहेत. २०१२ ते २०१५ या काळातच महामंडळात कोट्यवधींचे घोटाळे झाले.

साठे महामंडळाच्या कार्यालयातून फायली लंपास करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या चेंबूर येथील कार्यालयास अस्मिता संस्थेकडून त्याच दिवशी देण्यात आली.फायली पळविणाऱ्यांमध्ये साठे महामंडळातील घोटाळ्यांमधील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांचा भाऊदेखील होता, असे म्हटले आहे. आ. कदम या घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

इमारतीच्या तळमजल्यावर तीस वर्षे अस्मिता या सामाजिक संस्थेच्या वतीने मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग-चिकित्सा व पुनर्वसन केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या प्रमुख सुधा वाघ यांनी २८ एप्रिल रोजी घडलेल्या प्रकाराबाबत दहिसर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. गुंड प्रवृत्तीचे चार-पाच जण इमारतीत आले. त्यांनी सील-कुलूप तोडून काही फायली, कागदपत्रे कारमध्ये भरणे सुरू केले. आमच्या केंद्राच्या कर्मचाºयांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दादागिरी केली. तोडलेल्या कुलपांच्या जागी नवीन कुलपे व त्यावर जुजबी सील लावून ते कारने निघून गेले, असे या तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग ‘लोकमत’च्या हाती आले आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीRobberyदरोडा