शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

ऐन उन्हाळ्यात भाडेवाढीचे चटके

By admin | Updated: April 18, 2017 06:00 IST

शाळा व महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्यानंतर, अनेकांनी खासगी बसचे तिकीट आरक्षित करून बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असेल

मुंबई : शाळा व महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्यानंतर, अनेकांनी खासगी बसचे तिकीट आरक्षित करून बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असेल, तर त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. गर्दीचा काळ पाहून खासगी बस कंपन्यांनी प्रवास भाड्यात मोठी वाढ करून, ऐन उन्हाळ्यात भाडेवाढीचे चटके दिले आहेत. गोवा, शिर्डी, महाबळेश्वर, औरंगाबादच्या बस भाड्यात २00 ते ७00 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईतून नागपूरला जाण्यासाठी खासगी एसी बसने प्रत्येक प्रवाशामागे २,६४0 रुपये मोजावे लागतील. १५ एप्रिल ते १५ जून हा गर्दीचा काळ मानला जातो. यावेळी अनेक जण गावी तर पर्यटनासाठी गोवा, कोकण तर काही महाबळेश्वर, शिर्डीला जातात. यासाठी रेल्वे, एसटीकडून जादा सेवा पुरवल्या जात असल्या, तरी तिकीट मिळताना बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे खासगी बसचा पर्यायही निवडला जातो. खासगी बससेवांना होणारी गर्दी पाहता, ही सेवा पुरवणाऱ्यांनी भाडेवाढ केली आहे. मुंबई ते गोवा एसी स्लीपरचे भाडे हे कमी गर्दीच्या काळात ८०० रुपयांपर्यंत असते. या भाड्यात तब्बल ७०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. याच मार्गावर धावणाऱ्या नॉन एसीचे भाडे ५०० रुपये वाढवण्यात आले आहे. मुंबई ते शिर्डीचे एसीचे भाडेही ४०० रुपये असते. यंदा ते ६०० रुपयांवर आहे. मुंबईहून औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, भुसावळ, जालना, बीड, सोलापूर, अमरावती, नांदेड, सांगलीला जाणाऱ्या गाड्यांना होणारी मोठी गर्दी पाहता, नेहमीच्या भाड्यापेक्षा २०० रुपयांपासून अधिक वाढ केली आहे. (प्रतिनिधी)एसटी व खासगीमध्ये स्पर्धाएसटी व खासगी बससेवांमध्ये नेहमीच स्पर्धा राहिलेली आहे. खासगीबरोबरच एसटीचे मुंबई ते औरंगाबाद, कोल्हापूर, सांगलीचे एसीचे प्रवास भाडे हे १,१00 रुपर्यांपर्यंत आहे. साध्या व निमआराम बसचे भाडेमार्गसाधीनिमआराममुंबई ते मालवण५३६ रु७७१ रुमुंबई ते कणकवली४८५ रु६६२ रुमुंबई ते कोल्हापूर४१६ रु५६८ रुमुंबई ते औरंगाबाद४0३ रु५५0 रुमुंबई ते जालना४७३ रु६४५ रुमुंबई ते सातारा२८४ रु३८७ रु