शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

अन् अंकित स्वत:च निघाला अनंताच्या प्रवासाला...

By admin | Updated: January 6, 2015 01:07 IST

ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, शिकविले, कमावते केले, त्यांना त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त परदेशवारीची गोड भेट द्यावी यासाठी अंकितची जोरदार तयारी सुरू होती़

नियती निष्ठूर : गांधी कुटुंबावर आभाळ कोसळलेनागपूर : ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, शिकविले, कमावते केले, त्यांना त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त परदेशवारीची गोड भेट द्यावी यासाठी अंकितची जोरदार तयारी सुरू होती़ परंतु तिकडे काळाच्या मनात मात्र वेगळेच काही शिजत होते़ काळाच्या डावापासून अनभिज्ञ असलेला अंकित स्कूटरने निघाला होता. अखेर नियतीने डाव साधला अन् आई-वडिलांना परदेशवारी घडवण्याआधीच अंकितला अनंताच्या प्रवासाला निघावे लागले.रायबंदर-पणजी या जुन्या महार्गावर फियाट कार व दोन डिओ स्कूटर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात नागपुरातील अंकित हेमंत गांधी (२४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शांत स्वभावाच्या एकुलत्या एक अंकितचे अचानक निघून जाण्याने कुटुंबीयांसोबतच त्याच्या मित्रपरिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अंकित हा नागविदर्भ चेम्बर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष हेमंत गांधी यांचा मुलगा आहे. मा.बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत मनोहर गांधी यांचा तो नातू आहे.विधीचे शिक्षण घेतलेल्या अंकितला नुकतीच गोव्यातील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती. नववर्षाच्या दिनी त्याचा वाढदिवस होता. यातच तो घरापासून दूर असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. लवकरच तो एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी नागपूरला येणार होता. त्यासाठी त्याने तयारीही केली होती. अंकित नागपूरला येणार म्हणून आई-वडील आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी मुलगी पाहण्याचे ठरवले होते. इकडे अंकितनेही पुढील महिन्यात होऊ घातलेल्या आई-वडिलांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नियोजन केले होते. आई-वडिलांनी हाँगकाँग फिरून यावे, यासाठी तो आग्रही होता. सर्वांनाच त्याच्या येण्याची वाट होती. अंकितने नागपूरला येण्यासाठी तिकीटही काढून घेतले होते. परंतु रविवारी अचानक काळाने घाला घातला आणि अंकित सर्वांपासून दूर गेला. (प्रतिनिधी)हृदय पिळवटून टाकणारे हुंदकेसोमवारी रात्री अंकितचे पार्थिव विमानाने नागपुरात आणण्यात आल्यानंतर, अंत्यदर्शनासाठी ते काही वेळ धंतोली येथील ‘१५ आॅगस्ट’ या निवासस्थानी ठेवण्यात आले. यावेळी उपस्थितांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अतिशय समंजस आणि सर्वांना मदत करणारा अंकित असा अचानक निघून गेला, या विदारक सत्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते. नियती एवढी निष्ठूर असू शकते का? हा एकच प्रश्न या हुंदक्यातून येत होता. उशिरा रात्री स्थानिक मोक्षधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.