शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

करंजीच्या शेतकऱ्यांशी अंजली तेंडूलकरनी सांधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:46 IST

क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या सौभाग्यवती अंजली तेंडूलकर यांनी पाथर्डी तालूक्यातील करंजी गावाला धावती भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला

पाथर्डी ( जि. अहमदनगर) : क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या सौभाग्यवती अंजली तेंडूलकर यांनी पाथर्डी तालूक्यातील करंजी गावाला धावती भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती करण्यामध्ये रस असल्याचीे भावनाही त्यांनी व्यक्त केली.रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता सचिन तेंडूलकर यांच्या पत्नी अंजली एका आलीशान गाडीमधून करंजी येथील भट्टेवाडी येथे दाखल झाल्या. यावेळी अंजली तेंडूलकर यांच्या मावस बहीण श्रीमती कलीआ चाँदमाल सोबत होत्या. त्या शेतीतज्ञ असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्यासोबत आलेल्या तेंडूलकर यांचे संत्रा, मोसंबी आणि डाळींबाचे फळे देवून स्वागत केले. करंजी येथील भट्टेवाडी येथे सोशल सेंटर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. त्यानिमित्ताने गोवा येथून तेंडूलकर यांच्या मावस बहीण श्रीमती कमीआ चाँदमाल व अ‍ॅलीक्स मायकल या करंजी येथील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी गेली आठ दिवसापासुन ठाण मांडून आहेत. आपली बहीण ग्रामीण भागात एका खेडेगावात नेमक काय काम करतेय ते पाहाण्यासाठी सचिनची पत्नी अंजली यांनी थेट करंजी गाठली. यावेळी सखाराम क्षेत्रे, महादेव गाडेकर,पप्पू क्षेत्रे यांच्या शेतीमध्ये नैसर्गिक शेती कशा पधतीने करावी, याचे प्रात्यक्षिक सुरू आहे. कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते न वापरता तयार करण्यात आलेले चिकू,संत्रा,मोसंबी केळी,वांगे, पालकभाजी, कोथंबीर या फळबागांची पहाणी तेंडूलकर यांनी केली.यावेळी त्या म्हणाल्या, काळ बदलत चालला आहे. उदयोगधंद्यांमध्ये थोडी मंदिची लाट आहे. शेती हा तर शेतकऱ्यांच्या जीवन जगण्याचा महत्वाचा पर्याय आहे. शेती करण्याची आवड आहे.भारतरत्न आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडूलकर यांच्या निधीतून भट्टेवाडी येथे सभामंडप व काँक्रीट रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी गावचे सरपंच रफीक शेख यांनी तेंडूलकर यांच्याकडे केली. तेंडूलकर यांनी भट्टेवाडी येथील शेतकऱ्यांच्या घरीच दुपारचे जेवण घेतले. दूध, बाजरीची भाकरी व सोबत हिरव्या मिरचीचा ठेसा असे जेवण त्यांनी घेतले .--------सचिनला घेवुन येईन....शेतकऱ्यांच्या व्यथा सचिनला माहित आहेत. काही गाव त्याने दत्तक घेतली आहेत. बहिणीने राबवलेल्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी तुमच्या आवडत्या सचिनला पुढच्या वेळेस घेवून येईन, असे अंजली तेंडूलकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी छगनराव क्षेत्रे , डॉ मच्छिंद्र गाडेकर , भानुदास अकोलकर, जहांगीर मनियार, ग्रामसेवक राजेंद्र साखरे ,तनवीर शेख, आकाश क्षेत्रे, सचिन मेजर, सुनिल मुरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकर