शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसचे आमदार, खासदारांविरोधात "जवाब दो" आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 19:57 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्टला ४ वर्षे पूर्ण होत असून अद्याप मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 18 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्टला ४ वर्षे पूर्ण होत असून अद्याप मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान जवाब दो आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अंनिसचे शिष्टमंडळ प्रत्येक आमदार व खासदाराच्या घरी जाऊन यासंदर्भात जाब विचारणार आहे.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाटील म्हणाले की, शीना बोरा हत्याकांडाचा तपास अवघ्या काही महिन्यांत लागतो. मात्र सामाजिक कार्यकर्ते दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा उलगडा होण्यास अद्याप विलंब होत आहे. एकंदरीतच सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा  अभाव दिसत आहे. याउलट दोन्ही हत्यांमध्ये संशयित आणि आरोपी म्हणून सनातन संस्थेचे साधक समोर आले आहेत. तरीही या संस्थेविरोधात बंदीची कारवाई करण्यात सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तत्काळ या हत्येचा तपास पूर्णकरून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा आणि लोकसभेत जाब विचारावा, म्हणून अंनिसचे शिष्टमंडळ प्रत्येक आमदार व खासदाराची भेट घेणार आहे. आतापर्यंत संबंधित लोकप्रतिनिधीने दाभोलकर व पानसरे हत्याकांडासंदर्भात काय पावले उचलली, यासंदर्भातील विचारणाही शिष्टमंडळकरणार आहे. शिवाय आगामी काळात अधिक तीव्रतेने पाठपुरावा करून प्रकरणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार अंनिसने केला आहे.