शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

कर्करुग्णांचे ‘देवदूत’

By admin | Updated: May 1, 2017 05:25 IST

पांढरा शुभ्र सदरा-लेंगा...मदतीसाठी सतत वाजणारा मोबाईल ही हरखचंद सावला या देवदूताची खरी ओळख...गेली तब्बल ३२ वर्षे त्यांनी

स्नेहा मोरे / मुंबईपांढरा शुभ्र सदरा-लेंगा...मदतीसाठी सतत वाजणारा मोबाईल ही हरखचंद सावला या देवदूताची खरी ओळख...गेली तब्बल ३२ वर्षे त्यांनी नि:स्वार्थीपणे कर्करुग्णांच्या सेवेचे व्रत स्वीकारले आहे. सावला यांनी परळच्या भूमीत रुजविलेल्या ‘जीवनज्योती’ ट्रस्टचा वटवृक्ष झाला आहे.

जीवनज्योती’ ही संस्था सेंट जॉर्जेस, कामा, जे. जे आणि टाटा रुग्णालय येथे सुमारे ७००- ८०० रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण देते. त्यात लहानग्या कर्करुग्णांनाही शाळेत जाऊन जेवण देण्यात येते. औषध बँक, सिक बेड सर्व्हिस, लहान मुलांसाठी टॉय बँक (खेळणी पुरवणे) आणि कृत्रिम अवयव बनवून देणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून कर्करुग्णांचा आधारवड म्हणून महत्त्वाची भूमिका संस्था बजावत आहे. संस्था आता विस्तारली असून मुलूंड (मुंबई, ठाणे, जळगाव आणि कोलकाता येथेही संस्थेच्या शाखा आहेत.सावला यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. योग, व्यायाम इत्यादी नित्यक्रम आटोपल्यावर ते साडेआठ वाजता काम सुरू करतात. मग दिवसभरात जशी गरज असेल त्याप्रमाणे सेवा करतात. सकाळी सुरु केलेले काम अविरतपणे रात्री १०.३० पर्यंत सुरु असते. कर्करुग्णांप्रमाणे ते रस्त्यावरील भिकाऱ्यांची देखभाल करतात. गरज भासल्यास त्यांना रुग्णालयातही दाखल करतात. सावला यांच्यासोबत त्यांची मुले चिंतन आणि नियासा जमेल तसा हातभार लावतात. शिवाय, त्यांच्या पत्नी निर्मला यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व कार्य शक्य झाल्याचे सावला अभिमानाने सांगतात. प्रायश्चित्तामधून सुरू झाला प्रवाससावला यांना एका मायलेकीने टाटा रुग्णालयाचा पत्ता विचारला. मात्र, त्यांनी पालिकेच्या शीव येथील पालिका रुग्णालयाचा पत्ता दिला. टाटा रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार केले जातात, हे त्यावेळी त्यांना कळले नाही. ‘टाटा’ रुग्णालयाविषयी माहिती नसल्याची सल त्यांच्यात तशीच राहिली. त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून कर्करुग्णांना मदत करण्याचा वसाच त्यांनी घेतला.मुक्या जिवांचीही काळजीसंस्थेतर्फे प्राणी-पक्ष्यांचीही काळजी घेतली जाते. मुंबईतील २६ जुलैच्या प्रलयानंतर वेगवेगळ््या ठिकाणांहून आणलेल्या ३ हजार जखमी कबुतरांची त्यांनी काळजी घेतली होती. त्यांना अन्न-पाणी देत त्यांचे प्राण वाचवले. जखमी, आजारी पशु-पक्ष्यांवर संस्थेतर्फे मोफत उपचार करण्यात येतात.१०२ वेळा रक्तदानसावला यांनी आतापर्यंत १०२ वेळा रक्तदान केले आहे. कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्वरित रक्तदान करण्याची त्यांची तयारी असते. त्यांना १०६ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांनी स्वत:ला झगमगाटापासून दूर ठेवले आहे. अंत्यसंस्काराचीही सेवारुग्ण दगावला, नातेवाईक निघून गेले किंवा मृताचे नातेवाईक नसतील तर ते अंत्यसंस्काराचे कामदेखील करतात. कर्करोगामुळे अपंग झालेल्या रुग्णांना आधारासाठी इतरांची गरज भासते. त्यासाठी ते कृत्रिम अवयवदेखील मिळवून देतात.पॉकेटमनीपासून सुरुवातस्वत:च्या पॉकेटमनीपासून त्यांनी हे कार्य सुरु केले. कामाचा व्याप वाढत होता तशी त्यांना पैशांची चणचण भासू लागली. त्यांनी घराघरांतून जुने कपडे, भांडी, औषधे गोळा केली. जुन्या कपड्यांपासून गोधड्या शिवल्या आणि रुग्णांना त्या थंडीच्या काळात दिल्या. वर्तमानपत्रांची रद्दी विकूनसुद्धा त्यांनी निधी गोळा झाला. त्यातून रुग्णांना पावसाळ््यात छत्र्या पुरविल्या. आता कार्याचा विस्तार झाल्याने समाजातील दानशूर व्यक्तीही सहभाग दर्शवित आर्थिक मदत करत असतात.