शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिने पगार मिळाला नाही म्हणून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 17:52 IST

मुंबई : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा संवडकर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी ही दुख:द घटना घडली असून सुमित्रा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे कर्मचाऱ्यांमधून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.अंगणवाडी चालवुन सुद्धा पगार होत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या पत्रात ...

मुंबई : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा संवडकर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी ही दुख:द घटना घडली असून सुमित्रा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे कर्मचाऱ्यांमधून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.

अंगणवाडी चालवुन सुद्धा पगार होत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या पत्रात समोर आले आहे. कित्येकदा आंदोलन करून सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार कानाडोळा करत आहे. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू होत असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नेते दिलीप उटाणे यांनी केला आहे. 

उटाणे यांनी सांगितले की, राज्यातील जवळपास ६५ हजार  सेविका व मदतनिस यांचे जूनपासून मानधन झाले नाही. त्यात पीएफएमएस प्रणालीचा त्रासामुळेच आत्महत्या करत असल्याचे आत्महत्याग्रस्त सेविकेने चिठ्ठीत लिहिले आहे.  त्यामुळे आता आंगणवाडी कर्मचारी पीएफएमएस प्रणाली रद्द करण्यासाठी आंदोलन करतील. संपकाळात शासनाने दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही, म्हणूनच एका सेविकेला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मानधन देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समिताने केली आहे.

ऑनलाईन आणि डिजिटल इंडियाचा बळी...अंगणवाडी सेविका सुमित्रा सवंडकर हिची आत्महत्या नसून शासनाने केलेली डिजिटल हत्या आहे. शासनाला जाब विचारलाच पाहिजे. 10 वर्षांची सर्व रजिस्टर्स एकत्रित देण्याची जबरदस्ती करणार्‍यांवर 306 चा गुन्हा नोंदविण्यात यावा.- शुभा शमीम, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या.

सुमित्रा सवंडकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी...

टॅग्स :Suicideआत्महत्या