शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांनी तुटपुंजी वाढ नाकारली, १५०० रुपयांच्या मानधनवाढीनंतर कृती समिती आंदोलनावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 06:11 IST

अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.अंगणवाडी कर्मचा-यांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढवावे, या मागणीसाठी सेविकांनी ११ सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. त्याची दखल घेत, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन २५०० रुपयांवरून ३ हजार ५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ३ हजार २५० रुपयांवरून ४ हजार ५०० रुपये करण्यात आल्याचे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. या मानधानवाढीनंतर २५ टक्के अंगणवाडी सेविका कामावर रूजू झाल्याचा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.भाऊबीज वाढविलीशासनामार्फत अंगणवाडी कर्मचा-यांना दरवर्षी १ हजार रुपयांची भाऊबीज दिली जाते. या रक्कमेत दुपटीने वाढ करून, २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.>अंगणवाड्या बंदच राहणार!शेतकºयांच्या आंदोलनाप्रमाणेच सरकार कुटील डाव खेळून संप फोडण्याची प्रयत्न करत आहे. त्यामुळेच कृती समितीबाहेरील एका छोट्या संघटनेला हाताशी घेऊन, चर्चा करण्याचा देखावा सरकारने केला आहे.या डावाला कर्मचारी भुलणार नाहीत. मोठे संख्याबळ असलेल्या संघटना आमच्या कृती समितीमध्ये असून, सरकारच्या तुटपुंज्या वाढीने संप मागे घेणार नाही. यापुढेही अंगणवाड्या बंदच राहतील, असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील यांनी सांगितले.