डहाणू/कासा : डहाणू तालुक्यातील दोन वर्षापूर्वीची अंगणवाडी दुरूस्तीची देयके (बिले) रखडल्याने ती कामे करणाऱ्या ग्रामपंचायती व ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागातील अंगणवाडी दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली होती. ही कामे डहाणू बांधकाम उपविभागाकडून सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात आली व अंगणवाडी दुरूस्तीची कामे पूर्ण करून कामाची देयके (बीले) अदायगी (पासींग) साठी विभागीय कार्यालयात सादर करण्यात आली. परंतु ही बीले निधी होता तेव्हा पाठविली नसून ती उशिराने पाठविण्यात आली त्यामुळे निधी परत गेला. परिणामी देयके पाठविली तेव्हा ती मंजूर करण्यासाठीची तरतूद त्यावेळी नसल्याने देयके पारीत होऊ शकली नाही. आता दोन वर्षापासून नियोजित कामांना निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण विभागीय कार्यालय कडून सांगण्यात येत असल्याने बिल मंजूर होत नाहीत. त्यामुळे ती कामे करणाऱ्या ग्रामपंचायती व ठेकेदार मोठे अडचणीत सापडले आहेत. सिमेंट, विटा, पत्रे, रेती आदी माल मजूरांचे पैसे देण्यास ग्रामपंचायतींना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. (वार्ताहर) >१५ अंगणवाड्यांचे काम रखडलेतालुक्यात आदिवासी भागातील आंबेसरी, बारीपाडा, गंजाड, दिवाणपाडा, कैनाड, कोटवीपाडा, वाडूपाडा, चळणी, धरमपूर, धानिवरी, निंबापूर, वेती गावठाणपाडा आदी ११ ठिकाणी अंगणवाडी दुरस्तीची कामे पूर्ण करण्यात आली यामध्ये १५ लाख ४ हजार रूपयांची बिले रखडली आहेत.
अंगणवाडी दुरूस्तीची बिले डहाणूत रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 03:54 IST