शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार महिलांना अंगणवाडी नोकऱ्या; ३१ मेपर्यंत कालबद्ध भरती प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 06:07 IST

सर्व अंगणवाड्या होणार अपडेट, नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत.

अविनाश साबापुरे 

यवतमाळ : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्या महसुली गावात अंगणवाडी नाही तेथे नवीन अंगणवाडी उघडली जाणार आहे. त्यासाठी तब्बल २० हजार ६०१ जुनी रिक्त पदे भरली जाणार आहेत.

तसेच नव्याने सुरू होणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही खेड्यातील शिक्षित महिलांना नोकऱ्या मिळणार आहेत. ‘एकात्मिक बालविकास सेवा योजना’ या केंद्र पुरस्कृत योजनेतून महाराष्ट्रात अंगणवाड्या चालविल्या जातात. त्यामुळे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणताना या सर्व अंगणवाड्या अपडेट करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच २०१७ पासून रिक्त असलेली २० हजार पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. येत्या ३१ मेपूर्वी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचे निर्देश एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.  

महाराष्ट्रात दोन लाख पदांना मंजुरी   महाराष्ट्रात ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका तर १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका आणि ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस अशी २ लाख ७ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. नोव्हेंबर २०२२ च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडी सेविकांची ४ हजार ५०९, मिनी अंगणवाडी सेविकांची ६२६ आणि अंगणवाडी मदतनीसांची १५ हजार ४६६ अशी एकूण २० हजार ६०१ पदे रिक्त आहेत. ती ३१ मेपर्यंत भरण्याचे निर्देश आहेत.

अंगणवाडी सेविकांचा बांगडी मोर्चा गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलने करत असून, सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी अंगणवाडी सेविकांनी आपल्या मानधनवाढीच्या मागणीसाठी बांगडी मोर्चा काढला. या अनोख्या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यापूर्वीही सोलापुरातील या अंगणवाडी सेविकांनी चटणी-भाकरी मोर्चा काढला होता. 

बारावी  उत्तीर्ण हवी, उच्च शिक्षणालाही स्थान   नव्या पदभरतीमध्ये अंगणवाडी सेविका किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय तिच्याकडे पदवी, पदव्युत्तर पदवी, अन्य उच्च शिक्षण असल्यास भरती प्रक्रियेत त्या शिक्षणासाठी विशेष गुणांचा भारांश दिला जाणार आहे. शिवाय किमान ३५ वर्षे ही वयोमर्यादाही घालण्यात आली आहे. शिवाय संबंधित उमेदवार खेड्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.