शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अंगणवाड्यांचे सोमवारपासून कामबंद, कर्मचा-यांचा बेमुदत संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 22:43 IST

 राज्यातील दोन लाख 10 हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे अंगणवाडय़ा उघडणार नाहीत. अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे निमंत्रक बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले. 

ठाणे, दि. 10 - राज्यातील दोन लाख 10 हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे अंगणवाडय़ा उघडणार नाहीत. अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे निमंत्रक बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले. 

अधिकारीवर्गाच्या दादागिरीला घाबरणार नाही. कृती समिती संघटनेवर विश्वास असल्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी व्यक्त करून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. संपाच्या कालावधीदरम्यान 12 सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय मोर्चात अंगणवाडीसेविका शिस्तीत सहभागी होऊन हक्काची मागणी लावून धरणार आहेत. यासाठी सर्व अंगणवाडीसेविका लाल रंगाची साडी परिधान करून मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चात सहभागी होणा-या अंगणवाडी सेविकांमध्ये मुंबईच्या रस्त्यांची वाहतूक कोंडी करण्याची ताकद असल्याचे ब्रिजपाल सिंह यांनी सांगितले. या बेमुदत संपाचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांसह कुपोषित बालकांच्या पोषण आहार वितरणावर होणार आहे. जिल्ह्यात एक हजार 854 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्याद्वारे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, डोळखांब, शहापूर आदी नऊ  बाल प्रकल्पांतील सुमारे एक लाख 15 हजार बालकांसह आठ हजार 471 कुपोषित व 139 तीव्र कुपोषित बालकांच्या अंगणवाडी सेवेवर परिणाम होणार आहे.