शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Andheri East By Election Result Update: अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणी: पहिल्या दोन फेरींचा निकाल हाती; ऋतुजा लटकेंना 'नोटा'चा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 09:59 IST

देशभरातील सहा राज्यांतील सात विधानसभा सीटवर पोटनिवडणूक झाली आहे. आज यावर मतमोजणी होत असून तीन भगवा दल, दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि राजद अशा पक्षांकडे असलेले मतदारसंघ आहेत.  

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठी आघाडी मिळाली आहे. परंतू नोटाला पडलेल्या मतांनी देखील लक्ष वेधले आहे. 

पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांना ४२७७ मते मिळाली आहेत. तर नोटाला त्यापाठोपाठ ६२२ मते मिळाली आहेत. तर बाला नाडार - 222, मनोज नाईक - 56, मीना खेडेकवर- 138, फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127 एवढी मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत लटके यांना एकूण ७८१७ मते मिळाली. या फेरीतही लटके यांना आघाडी मिळाली आहे. अंधेरीत सात उमेदवार रिंगणार आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत नोटाला १४७० मते मिळाली आहेत.

देशभरातील सहा राज्यांतील सात विधानसभा सीटवर पोटनिवडणूक झाली आहे. आज यावर मतमोजणी असणार असून तीन भगवा दल, दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि राजद अशा पक्षांकडे असलेले मतदारसंघ आहेत.  

अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान झाले आहे. अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बाला नाडर यांनी आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून अर्ज भरला आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरल्याने तसेच भाजपा-शिंदे गटाने नोटाचा कथित प्रचार केल्याने ठाकरे गटाच्या गोटात अस्वस्थता आहे. 

टॅग्स :andheri-east-acअंधेरी पूर्वAndheriअंधेरीShiv Senaशिवसेना