शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

...आणि दोन तरुणांना गमवावा लागला जीव

By admin | Updated: July 29, 2016 19:17 IST

एका कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना सायन येथे घडली. कारचा दरवाजा चालकाने उघडताच मागून येणाऱ्या बाईकची दरवाजाला धडक

कारच्या उघडलेल्या दरवाजाला बाईकची धडक, बसनेही दोघांना चिरडलेमुंबई - एका कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना सायन येथे घडली. कारचा दरवाजा चालकाने उघडताच मागून येणाऱ्या बाईकची दरवाजाला धडक बसली आणि बाईकवर असलेले दोघे जण खाली कोसळताच मागून येणाऱ्या स्कूल बसने त्यांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बस चालकाला अटक करण्यात आली असून कार चालकाने पलायन केले.

गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास सायनमधील रोड नंबर २९ चम्पकलाल इस्टेट इमारतीजवळ एक होंडा सिटी कार उभी होती. होंडा सिटी कार चालकाने बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूचा दरवाजा उघडला. त्याचवेळी मागून अ‍ॅक्टीवा बाईकवरुन कुशल यादव (२0) आणि श्रवण बोराना (२0) हे दोघे जण येत होते. कारचा दरवाचा उघडताच बाईकची धडक दरवाजाला बसली आणि त्यात बाईकसह दोघेही खाली कोसळले. खाली कोसळताच त्यांच्याच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कूल बसने त्यांना धडक दिली. यात कुशल आणि श्रवण दोघेही गंभीर जखमी झाले.

ही घटना पाहणाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी त्वरीत सायन रुग्णालयात दाखल केले. तर उपस्थितांनी बस चालक निलेश लाटेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील घटनेस जबाबदार असणारी होंडा सिटी कार मात्र तेथून त्वरीत निघून गेली. बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून होंडा सिटी कार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. यासंदर्भात माटुंगा वाहतूक पोलिस चौकीचे पोलीस निरिक्षक सुनिल कदम यांनी सांगितले की,कार चालकाने कारसह पलायन केले आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेत भरधावपणे बस चालकाला मात्र अटक केली आहे.