शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

...आणि ‘त्या’ आॅडिओ क्लिपचे सत्य उलगडले, दु:खाच्या प्रसंगीही शहीद राणे यांच्या कुटुंबीयांचा समजूतदारपणा''

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:44 IST

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने एक खोटी आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

मुंबई - शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने एक खोटी आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचताच, दहिसरच्या एका तरुणीने ही आॅडिओ क्लिप व्हायरल केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आपण कुठल्याही स्वार्थी अथवा चुकीच्या उद्देशाने ती बनवली नसल्याचे सांगत तिने राणे कुटुंबीयांची माफी मागितली. तरुणीचे नुकतेच लग्न ठरले असल्याने तिचे नुकसान होऊ नये म्हणून दु:खाच्या प्रसंगीही राणे कुटुंबीयांनीही समजूतदारपणा दाखवत ते प्रकरण तेथेच मिटवले.काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. याच दरम्यान त्यांच्या पत्नीच्या नावाने एक खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये शहीद राणे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. ती आॅडिओ क्लिप खोटी असल्याचे राणे यांच्या पत्नीकडून समजताच नानाविध चर्चांना पेव फुटले.अखेर राणे यांचे नातेवाईक मिहीर यांनी समतानगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात यामागे दहिसरच्या तरुणीचा सहभाग उघड झाला. त्यानुसार, मंगळवारी तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. या वेळी राणे यांचे नातेवाईकही हजर झाले.फक्त देशभक्तीतून ती आॅडिओ क्लिप व्हायरल केली. यामध्ये आपला कुठलाही स्वार्थी हेतू नसल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. शहीद राणे यांच्या कुटुंबीयांना झालेल्या नाहक त्रासाबद्दल तिने माफीही मागितली. शिवाय आपले लग्न ठरले असून प्रकरण मागे घेण्याबाबत विनंती केली. राणे कुटुंबीयांनीही तेथेच ते प्रकरण मिटवले. त्यामुळे या प्रकरणात पुढे कुठल्याही स्वरूपाची कारवाई होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Kaustubh Raneकौस्तुभ राणेnewsबातम्या