शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

...आणि लालू प्रसाद यादव यांनी दाखवला होता उदारपणा

By admin | Updated: May 7, 2014 21:16 IST

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीत त्यावेळेचे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भरघोस वाढ केली आणि आपला उदारपणा दाखवून दिला.

२00६ मध्ये रेल्वेच्या सिरियल ब्लास्टमधील मृतांच्या नातेवाईकांना मिळवून दिली ५ लाखांची मदत

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर २00६ मध्ये सिरियल ब्लास्ट झाला आणि मुंबईत एकच हाहाकार उडाला. यात तब्बल २00 पेक्षा अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांनी तर आपल्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीही गमावला. या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीत त्यावेळेचे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भरघोस वाढ केली आणि आपला उदारपणा दाखवून दिला. मात्र हाच उदारपणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणार्‍या नातेवाईकांच्या बाबतीत दाखविला नाही. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. ११ जुलै २00६ रोजी अकरा मिनिटांच्या अंतराने पश्चिम रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात २0९ जणांचा मृत्यू तर ७00 जण जखमी झाले. रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना होती. तेव्हा मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख यांनी मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेची माहीती मिळताच त्यावेळी रेल्वेमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी मुंबई गाठली आणि घटनास्थळांना भेट दिली. सुरुवातीला रेल्वेतर्फे मृताच्या नातेवाईकांना तातडीची ५0 हजार रुपये मदत देण्यात आली होती. मात्र ही मदत तोकडी असल्याने त्यांनी आपल्या अधिकार वापरुन त्यात साडे चार लाख रुपयांची वाढ केली आणि एकूण पाच लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना दिले. तर घरातील कर्ताधर्ता व्यक्ती गमावलेल्यांना त्यांनी नोकरीही देण्याचा निर्णय घेतला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मिळाली का नाही याचा पाठपुरावाही त्यांच्याकडून त्यावेळी करण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. तर नोकरी देण्याबाबत कुठले निकष आहेत याची पडताळणीही त्यांनी केली आणि तशी मदतही त्यांनी केली. लालू प्रसाद यादव यांनी त्यावेळी आपला अधिकार वापरुन आर्थिक मदतीत वाढ करुन मदत दिल्याची ती पहिलीच घटनाही असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मात्र दुदैवी कोकणवासियांच्या बाबतीत अशी आर्थिक मदत त्यांना मिळालीच नाही. कोकणात जाणार्‍या पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला आणि या अपघातात तब्बल २२ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. कोकण रेल्वेवर झालेल्या या अपघातात अनेकांना आपल्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीही गमवावा लागला. मात्र त्याची जराही तमा न बाळगता रेल्वे प्रशासनाकडून अवघे दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन आणि त्याची माहीती घेतल्यानंतरही नुकसान भरपाई वाढवून देण्याबाबत साधा ब्र देखिल न काढल्याने लालू प्रसाद यादव यांच्याकडून त्यांनी धडा घ्यावा, अशी मागणीच आता कोकणवासियांकडून केली जात आहे.