ऑनलाइन लोकमतजऊळका रेल्वे, दि. 17 - मालेगाव तालुक्यात चोरीचे प्रमाण थांबता थांबत नाही. दररोज एक ना एक चोरी झाली नाही, असा दिवस उगवला नाही. यामुळे अनेक गावातील नागरिकांनी रात्री गस्त सुरू केली असता यामध्ये डव्हा येथे चोरी करण्यासाठी आलेल्याने चक्क कुलरचा आसरा घेत त्यामध्ये लपून बसला होता. त्याला बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील विशाल तडसे या शिक्षकाच्या घरी १७ आॅगस्टच्या रात्री दीड वाजताच्या दरम्यान घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत चोर असल्याचा संशय तडसे यांना आला असता त्यांनी जावून पाहिले असता कुलरमध्ये लपून बसलेला चोर आढळून आला. ग्रामस्थांना बोलावून त्याला पकडण्यात आले व पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत तडसे यांनी जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विकास राठोड नामक २२ वर्षीय युवकासह दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम ४५७, ३८०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
...आणि चोर कुलरमध्ये बसला लपून !
By admin | Updated: August 17, 2016 17:54 IST