शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

...आणि मदतीचा हात निखळला!

By admin | Updated: July 19, 2014 02:45 IST

सगळ्यांच्या जीवाभावाचा, प्रत्येक अडचणीला मदतीसाठी धावून जाणारा आणि आपत्कालीन परिस्थितीदरम्यान लोकांचे जीव वाचविण्यासाठी सदैव तत्पर असणारा नितीन हा ‘मदतीचा हात’ होता

मुंबई : सगळ्यांच्या जीवाभावाचा, प्रत्येक अडचणीला मदतीसाठी धावून जाणारा आणि आपत्कालीन परिस्थितीदरम्यान लोकांचे जीव वाचविण्यासाठी सदैव तत्पर असणारा नितीन हा ‘मदतीचा हात’ होता. त्यांच्या या स्वभावाची सहकाऱ्यांनाही कल्पना होती. म्हणूनच अंधेरी येथे कर्तव्यासाठी दाखल झालेले अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जास्त पुढे जाऊ नकोस...’ असे सांगितले होते. परंतु ते नेहमीप्रमाणे सरसावले आणि घात झाला...‘लोटस’ ला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर शहीद झाले. आणि त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. नितीनचे बाबा महापालिकेत नोकरीला होते. त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नितीन यांनी २००५ साली अग्निशमन दलात प्रवेश केला. २०१० साली बोरीवली येथील अग्निशमन दल केंद्रात त्यांची बदली झाली. नितीन यांनी जे.जे. आर्टस्मधून इंटिरिअर डिझाईनचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांना सजावटीची आवड होती. म्हणून बोरीवली येथील अग्निशमन दलाच्या केंद्रातील बागकामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी ती पेलल्याने येथील बाग बहरून गेली होती. शिवाय मित्रांच्या घरी कार्यक्रमादरम्यानची सजावट असो वा एखादा कार्यक्रम; त्यात नितीन त्यांना विनातक्रार मदत करत. त्यामुळे एखादे काम निघाले की साहजिकच नितीनला हाक मारली जायची. मात्र आता त्यांच्या जाण्याने त्यांच्या घरासह त्यांचा सहकारी वर्गही पोरका झाला आहे.मानखुर्द येथे पत्नी भूभागी आणि दोन मुलींसोबत वास्तव्य करणारे नितीन यांनी नुकतेच विरार येथील ग्लोबल सिटी संकुलात नवे घर घेतले होते. आणि पंधराएक दिवसांपूर्वी त्यांनी नव्या घरात प्रवेश केला होता. मात्र आता त्यांच्या जाण्याने घरावर आभाळ कोसळले आहे. (प्रतिनिधी)