शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्या दाम्पत्याचा अहंकार विखुरला,मुलावरील प्रेम ठरले वरचढ

By admin | Updated: January 17, 2017 22:56 IST

आई-वडिलांसाठी त्यांची मुलेच सर्वस्व असतात. मुलांसाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी असते. उच्च न्यायालयातील एका प्रकरणामुळे हा अनुभव अनेकांना आला.

राकेश घानोडे / ऑनलाइन लोकमतनागपूर : आई-वडिलांसाठी त्यांची मुलेच सर्वस्व असतात. मुलांसाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी असते. उच्च न्यायालयातील एका प्रकरणामुळे हा अनुभव अनेकांना आला. मुस्लीम आई-वडिलाने एकुलत्या एक मुलाच्या भविष्यासाठी आपसातील भांडण सामंजस्याने संपवले.

सर्वांचे प्रयत्न हरल्यानंतर केवळ मुलावरील प्रेमामुळे त्यांच्यातील अहंकार विखुरला. प्रकरणातील दाम्पत्य अनवर व झेबा (काल्पनिक नावे) नागपुरातील रहिवासी आहेत. ४ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांचे लग्न झाले. यानंतर ते काही वर्षे आनंदात एकत्र राहिले. दरम्यान, त्यांना मुलगा झाला. मुलाचे चांगले पालन-पोषण करून त्याला यशस्वी व्यक्ती करण्याची स्वप्ने त्यांनी रंगवली. परंतु, अचानक त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. वाद वाढत गेला. दोघांपैकी कोणीच माघार घेतली नाही. नातेवाईकांनी समजावूनही त्यांच्यातील दुरावा कमी झाला नाही. रागाच्या भरात झेबाने अनवर हा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची तक्रार सक्करदरा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अनवरविरुद्ध भादंविच्या कलम ४९८-अ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला. त्यानंतर दोघेही विभक्त झाले. 

अनवर व झेबामधील भांडणाचा सर्वाधिक त्रास त्यांच्या मुलाला झाला. मुलाची परवड व्हायला लागली. मुलाला आई व वडील हे दोघेही हवे होते. मुलावर जीवापाड प्रेम असलेल्या अनवर व झेबाला त्याच्या जीवाची घालमेल सहन झाली नाही. त्यांनी मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामंजस्याने भांडण संपवून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते एकत्र रहायला लागले आहेत. अनवर व झेबाने घेतलेली भूमिका अन्य पालकांसाठी आदर्श ठरेल असे मत अनेक वकिलांनी व्यक्त केले.हायकोर्टाने ठरवली तडजोड वैधअनवर व झेबाच्या नव्याने फुललेल्या संसारातील अडचणी सक्करदरा पोलीस ठाण्यातील ‘एफआयआर’मुळे वाढण्याची शक्यता होती.  कायद्यानुसार ‘एफआयआर’ रद्द करणे आवश्यक होते. त्यासाठी अनवरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी अनवर व झेबातील तडजोड वैध ठरवून एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश देताना ‘बी. एस. जोशी वि. हरयाणा शासन’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे.  अनवर व झेबा न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित होते. मुलाच्या भविष्यासाठी वाद सामंजस्याने संपविल्याचे व आता एकत्र रहात असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.