शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आणि स्मशानभूमीत पार पडला विवाहसोहळा

By admin | Updated: May 30, 2017 17:20 IST

आजवर वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालेली आपण पाहिली असतील मात्र भगवंताचे अधिष्ठान असलेल्या

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 30 - मनुष्याच्या जीवनात जन्मल्यापासून ते मरेपर्यंत अनेक प्रकारचे संस्कार केले जातात़त्यामध्ये लग्नसंस्कार हा देखील आयुष्याच्या टप्प्यावरील महत्वाचा संस्कार आहे़ आजवर वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालेली आपण पाहिली असतील मात्र भगवंताचे अधिष्ठान असलेल्या बार्शी शहरात चक्क स्मशानभूमीमध्ये (मोक्षधाम ) प्रतिष्ठीत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसन्नदाता गणेश मंदीर ट्रस्टच्या सहकार्याने अनोखा विवाह सोहळा पार पडला़. बार्शी शहरात धसपिंपळगाव रोडवर बार्शी नगरपालिकेची स्मशानभूमी आहे़ मागील दहा ते पंधरा वर्षापुर्वी या भागात लहान मुले किंवा नागरिक देखील जायला भित असत,मात्र मागील सहा वर्षापुर्वी बार्शीतील प्रसन्नदाता गणेश मंदीर ट्रस्टच्या वतीने ही स्मशानभूमी विकसीत करण्यासाठी घेतली़ त्यानंतर या स्मशानभूमीचे रुपच पालटले गेले आहे़ सुमारे एक हजाराच्या जवळपास लावलेली हिरवी झाडे, अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी भव्य असे स्टेडियम, सहा दहनशेड, लाईट व्यस्था, न्हावी कट्टा, आ़ दिलीप सोपल यांच्या निधीतून अंतर्गत डांबरी रस्ते, संरक्षक भिंत, लॉन आदी सुविधा अध्यक्ष कमलेश मेहता यांनी केलेल्या आहेत़. बार्शीच नव्हे तर कोणत्याही स्मशानभूमीत माणूस हा आनंदाने जात नाही, कारण माणसावरील अंतिम संस्कारासाठी जड अंतकरणाने व पावलावे तो तिकडे जात असतो, त्याठिकाणी जाणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर मोठे दु:ख असते़ त्यामुळे स्मशानात लग्न ही कल्पनाच मनाला रुचत नाही मात्र हे बार्शीत आज प्रत्यक्षात घडले आहे़ स्मशानभूमीमध्ये उभारलेल्या या सुविधांची निगा राखण्यासाठी बार्शी व परिसरातील कोण रहाण्यास तयार नव्हते त्यामुळे प्रसन्नदाता ट्रस्टने नांदेड येथून स्मशान जोगी कुटुंबाला बार्शीत आणले़ मागील कांही वर्षापासून लक्ष्मण धनसरवाडकर हे कुटुंब लहान मुला-बाळांसह याठिकाणी रहात आहे़ लक्ष्मण यांचे बंधू अंकुश घनसरवाडकर रा़ हदगाव जि़ नांदेड यांचा शुभविवाह छाया गंगाधर गंधेवाड रा़ हदगाव जि़ नांदेड यांच्याबरोबर ठरला व त्या कुटुंबाच्या आग्रहाखातर हा सोहळा आज दुपारी मोक्षधाममधील मुक्तेश्वर मुर्तीसमोर टाकलेल्या मांडवात मंगलअष्टकांसह संपन्न झाला़या अनोख्या विवाह सोहळ्यांची बार्शी व परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे़