शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वेसावकरांची अणुकुचीदार भाल्याने हंडी फोडण्याची पुरातन परंपरा

By admin | Updated: August 24, 2016 21:33 IST

मासेमारी केरळ नंतर वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो.मुंबईत काँस्मोपाँलिटीयन संस्कृतीत आणि आज गगनचुंबी इमारती मोठ्या प्रमाणत उभ्या राहिल्या असतांना

मनोहर कुंभेजकर

मुंबई, दि. 24 - मासेमारी केरळ नंतर वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो.मुंबईत काँस्मोपाँलिटीयन संस्कृतीत आणि आज गगनचुंबी इमारती मोठ्या प्रमाणत उभ्या राहिल्या असतांना आज मुंबईचा मूळ नागरिक असलेल्या वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा आणि संस्कृती कायम ठेवली आहे.गेल्या १००वर्षापासून वेसावे कोळी जमात पब्लिक रिलीजियस अँन्ड चँरिटेबल ट्रस्टच्यावतीने वेसावे कोळीवाड्यातील साजरे होणारे विविध सण आणि उत्सवाचे नियोजन केले जाते.यंदा उद्याच्या दहीहंडीचा मान नऊ वर्षांनी वेसावा कोळी जमात रिलीजियस अँन्ड चँरिटेबल ट्रस्टला मिळाला आहे.या ट्रस्टचे अध्यक्ष मनीष भुनगवले यांना यंदाचा दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला आहे.मुंबई आणि राज्यात सर्वत्र मनोरे रचून हंडी फोडण्याची परंपरा असतांना मात्र याला अपवाद वेसावे कोळीवाडा आहे.येथील राम मंदिर परिसरात अणुकुचीदार भाल्याने हंडी फोडण्याची वेसावकरांची पुरातन परंपरा आहे.वेसावे कोळीवाड्याची भोगोलिक परिस्थिती लक्षात घेता वेसावे कोळीवाड्यात डोंगरी गल्ली,मांडवी गल्ली,बाजार गल्ली,गोमा गल्ली,पाटील गल्ली,बुधा गल्ली,तेरे गल्ली,शिवगल्ली व कास्कर बंधू असे एकूण ९ पाडे( गल्या) आहेत.दरवर्षी प्रत्येक विभागाला येथील हंडी फोडण्याचा मान दिला जातो.दर नऊ वर्षानी हा मान एका गल्लीला मिळतो.पावसाळी मासेमारी संपल्यानंतर मोठ्या कष्ठाने नव्या मासेमारीची सुरवात आपल्या बोटीना रंगरंगोटी-डागडुजी करून येथील कोळी बांधव मासेमारीसाठी सज्ज होतात.नारळी पौर्णीमेला सुमुद्राला नारळ अर्पण केल्या नंतर दुसऱ्या दिवशी येथील श्री शंकर आणि श्री राम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात होते.गावातील गल्यांच्या विविध मंडळांना अखंड हरिनाम सप्ताहात आळीपाळीने सहभागी होण्याचा मान दिला जातो.ज्या गल्लीला हंडी फोडण्याचा मान आहे ती गल्ली दहीहंडी उत्सवाचे सर्व नियोजन करते.ज्या गल्लीला हंडी फोडण्याचा मान असतो त्या गल्लीतील सर्व स्त्रिया-पुरूष आणि लहान मुले यांच्यासाठी खास गणवेश तयार केला जातो.यंदा वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या सर्व विश्वस्त आणि सभासद आणि हितचिंतकासाठी निळ्या रंगाचा गणवेश तयार करण्यात आला आहे अशी माहिती ट्रस्टचे मानद सचिव जयंत भावे आणि खजिनदार शांताराम धाको यांनी दिली.पौराणिक देखावे चलचित्रद्वारे मिरवणुकीत सादर करून दहीहंडी वाजतगाजत येथील श्रीराम मंदिरात नेली जाते.नेत्रदीपक अश्या या दहीहंडी मिरवणुकीला संपूर्ण वेसावे गाव लोटला असतो.श्रीराम मंदिर परिसरात दहीहंडी बांधली जाते.त्याचबरोबर अणकुचीदार भाल्याची पूजा केली जाते.नंतर ज्या गल्लीला हंडी फोडण्याचा मान आहे त्यागल्लीचा अध्यक्ष येथील मानाची हंडी फोडतो.यंदाची हंडी फोडण्याचा मान वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष मनीष भुनगवले यांना मिळाला आहे.त्यानंतर गावतील अन्य गाल्यांच्या हंड्या देखिल मिरवणुकीने आणि वाजतगाजत या जमातीतर्फे यंदा फोडण्यात येणार आहेत.गावातील सर्व हंड्या फोडल्यावर वाजत-गाजत भाला झ्रकाठी अभंगाच्या गजरात मंदिरात आणली जाते.आणि मग भगवंताची आरती झाल्यावर या उत्सवाची यशस्वी सांगता होते.